VIDEO | सुख के सब साथी, दुःख में ना कोई, भाजप आमदार सुरेश धसांच्या गाण्याने काळजाला हात

सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कवी संमेलनात त्यांनी गाणं सादर केलं. (BJP Suresh Dhas Sings Song)

VIDEO | सुख के सब साथी, दुःख में ना कोई, भाजप आमदार सुरेश धसांच्या गाण्याने काळजाला हात
भाजप आमदार सुरेश धस यांचे गाणे
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 2:09 PM

बीड : भाजपचे विधान परिषद आमदार सुरेश धस (Suresh Dhas) वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतात. सध्या त्यांनी गायलेलं एक गाणं चांगलंच चर्चेत आहे. ‘सुख के सब साथी, दुःख में ना कोई’ हे गाणं सुरेश धस यांनी आपल्या अनोख्या अंदाजात सादर केलं. (Beed BJP MLC Suresh Dhas Sings Song Viral Social Media Trending)

सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. निमंत्रित कवींच्या संमेलनात सहभागी झालेल्या सुरेश धस यांना कार्यकर्त्यांनी कविता प्रस्तुत करण्याची विनंती केली. सुरेश धस यांनी मला कविता येत नाही, पण मी गाणं म्हणतो, असं सांगत सूर छेडले. त्यांनी गायलेल्या गाण्याची सध्या सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

सुरेश धस आणि त्यांच्या मुलामध्ये कुस्तीचा डाव रंगला असतानाचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा आखाडा डोळ्यासमोर ठेऊन सुरेश अण्णांनी मुलगा जयदत्त धस यांना कुस्तीच्या फडात राजकीय डावपेचांचे धडे द्यायला सुरुवात केली, अशी चर्चा त्यामुळे रंगली होती.

कोण आहेत सुरेश धस?

सुरेश धस हे बीडच्या राजकारणातील एक मोठं नाव. ‘आण्णा’ म्हणून ते समर्थकांमध्ये लोकप्रिय आहेत. धस हे सध्या भाजपच्या तिकीटावर विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या अशोक जगदाळे यांचा पराभव करुन सुरेश धस जून 2018 मध्ये अटीतटीच्या लढतीत विधानपरिषदेवर गेले.

राज्यातील राजकीय वातावरण पाहून निर्णय घेणारा नेता म्हणून सुरेश धस यांच्याकडे पाहिले जाते. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरेश धस राष्ट्रवादीत होते. 2009 मध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. त्यांनी राज्यमंत्रिपदही भूषवले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सुरेश धस तर भाजपकडून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हे आमनेसामने होते. या लढतीत सुरेश धस यांचा पराभव झाला.

‘सालकरी’ ही संकल्पना राजकारणात रुढ

आष्टी मतदारसंघात निवडून आल्यानंतर आपण आमदार नाही, तर पाच वर्षांसाठी मतदारांचे सालकरी आहोत, असे सांगत धस यांनी ‘सालकरी’ ही संकल्पना राजकारणात रुढ केली. (Beed BJP MLC Suresh Dhas Sings Song Viral Social Media Trending)

त्यानंतर बीड जिल्हा परिषदेत त्यांनी भाजपशी सख्य साधलं. काही दिवसांनी पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक साधत सुरेश धस यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपच्या तिकीटावर विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.

जयदत्त धस विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून

सुरेश धस 2019 च्या निवडणुकीत मुलाला आमदार करण्यासाठी कामाला लागले होते. त्यादृष्टीने त्यांनी तयार देखील केली होती. मात्र तांत्रिकदृष्ट्या अडचण असल्याने शेवटच्या काही दिवसांत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना पडद्यामागून मदत करुन त्यांच्या विजयात हातभार लावला, अशी चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात मोठ्या खुबीने होत असते.

संबंधित बातम्या :

राजकीय आखाड्यातील बापलेकात ‘डावपेच’, सुरेश धस यांची मुलासोबत कुस्ती

बँक मॅनेजरला घरी बोलावून पाय धुतले, आमदार सुरेश धस यांची गांधीगिरी

(Beed BJP MLC Suresh Dhas Sings Song Viral Social Media Trending)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.