बीडचे दोन्ही उमेदवार सोमवारी अर्ज भरणार, प्रचाराचा नारळ फुटणार

बीड : भाजपकडून बीडमध्ये अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि प्रितम मुंडे यांचा दोघांचाही उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल होणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत वाढणार आहे. मुख्य पक्षांच्या उमेदवारांसह इतर उमेदवारही गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. पण मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच […]

बीडचे दोन्ही उमेदवार सोमवारी अर्ज भरणार, प्रचाराचा नारळ फुटणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

बीड : भाजपकडून बीडमध्ये अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि प्रितम मुंडे यांचा दोघांचाही उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल होणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत वाढणार आहे. मुख्य पक्षांच्या उमेदवारांसह इतर उमेदवारही गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. पण मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच होणार आहे.

भाजप उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आणि यात प्रितम मुंडे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांमध्ये यामुळे सध्या उत्साहाचं वातावरण आहे. प्रितम मुंडे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच गावागावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. आता सोमवारी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादीकडूनही बजरंग सोनवणे या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बहिणीविरोधात प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. कारण, त्यांचे विश्वासू बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. धनंजय मुंडेंनीही जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावला आहे.

दुसरीकडे शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. उमेदवार कालिदास आपेट यांनी पहिलाच उमेदवारी अर्ज दाखल केला. आणखी काही उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. बीडमध्ये बहुजन वंचित आघाडीकडूनही राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवाराला टक्कर दिली जाईल. त्यामुळे मतदार कुणाला कौल देतो त्यावर निर्णय अवलंबून असेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.