Vinayak Mete: “अपघात नेमका कुठे झाला हे ड्रायव्हर सांगत नव्हता, एकनाथ काही कच्चे दुवे लवपतोय”, मेटेंच्या पत्नीचे गंभीर आरोप

Dr. Jyoti Mete: विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अपघात नेमका कुठे झाला हे ड्रायव्हर सांगत नव्हता, एकनाथ काही कच्चे दुवे लवपतोय", अशी संतप्त प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली आहे.

Vinayak Mete: अपघात नेमका कुठे झाला हे ड्रायव्हर सांगत नव्हता, एकनाथ काही कच्चे दुवे लवपतोय, मेटेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 12:40 PM

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं परवा म्हणजे 14 ऑगस्टला अपघाती निधन झालं. पण त्यांच्या गाडीसोबत घडलेली घटना हा अपघात आहे की घातपात आहे? अशी शंका उपस्थित केली जात असतानाच आता विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे (Dr. Jyoti Mete) यांनी गंभीर आरोप केले आहेत. “अपघात नेमका कुठे झाला हे ड्रायव्हर सांगत नव्हता, एकनाथ काही कच्चे दुवे लवपतोय”, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा अपघाताचं ठिकाण मला कुणीही सांगत नव्हतं. ड्रायव्हरशी बोलले तरी तोही ते ठिकाण सांगत नव्हता. पण हा ड्रायव्हर मागची काही वर्षे आमच्यासोबत काम करतोय. मेटेसाहेबांच्या सोबत तो सर्वत्र जात असे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन देखील त्याने साहेबांसोबत प्रवास केला आहे. त्याला तो रस्ता चांगलाच माहिती आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कुठे झालाय हे त्याला माहिती असावं, पण त्याला ते सांगता न येणं, हे आक्षेपार्ह आहे, असं ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.

मला वाटतं या प्रकरणात काही कच्चे दुवे आहेत. जे मिसिंग आहेत. त्याचा मला कुठेही मेळ लागत नाहीये. एकनाथ काहीतरी लपवतोय, असं म्हणत ज्योती मेटे यांनी शंका उपस्थित केली आहे. त्याने प्राथमिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. अॅब्युलन्स मिळवण्यासाठी, मदतीसाठी प्रयत्न करायला हवा होता. कदाचित त्याने तसे प्रयत्न केलेही असतील. हे एकनाथच सांगू शकतो की त्याने काय प्रयत्न केले किंवा इतर बाबी… त्याने मला बीडला फोन केला. पण त्यावेळी त्याने पटकन मदत घेणं गरजेचं होतं, असंही त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

मी जेव्हा हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर मला अपघाताची वेळ कळाली त्याआधीच साहेबांचा मृत्यू झालेला आहे, हे मला लक्षात आलं. त्यामुळे काहीतरी मिसिंग आहे. कुठलीतरी कडी माझ्यापासून लपवली जात आहे, हे मला कळत होतं, असं ज्योती म्हणाल्या.

शिवसंग्रामच्या बीडच्या पदाधिकाऱ्यांनीही शंका उपस्थित केली आहे. याआधीही त्यांच्यासोबत घातपाताचा प्रयत्न करण्यात आला होता, असं शिवसंग्रामचे नेते अण्णासाहेब वायकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं आहे. तीन ऑगस्टला बीडहून पुण्याला जात असताना शिक्रापुरच्या आसपास आयशर गाडीने पाठलाग केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा ही गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचं मी मेटेसाहेबांना सांगितलं. पण ड्रायव्हर नशेत असेल म्हणून तो वारंवार पाठलाग करत असेल, असं ते म्हणाले. त्यामुळे आम्ही शांत बसलो. पण आता जो अपघात झाला त्यातही जर आयशर गाडी असेल आणि तीन तारखेला पाठलाग केलेलीच गाडी असेल, तर हा घातपातच असावा, अशी शंका वायकर यांनी उपस्थित केली आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.