Video | …आणि आमदार संदीप क्षीरसागर चक्क स्वतः झाडावर चढले! असं त्यांनी नेमकं का केलं?

Beed Mla Sandip Kshirsagar : बीड जिल्ह्यात नात्यांचं राजकारण काही नवं राहिलेलं नाही. एकीकडे ताई-दादा तर दुसरीकडे काका-पुतण्या असा संघर्ष बीडमधील जनतेनं पाहिलेला आहे.

Video | ...आणि आमदार संदीप क्षीरसागर चक्क स्वतः झाडावर चढले! असं त्यांनी नेमकं का केलं?
झाडावर चढलेल्या महिलांची समजूत काढण्यासाठी आमदार महोदयच चक्क झाडावर चढले!
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 12:19 PM

बीड : बीड जिल्ह्यात आज संदीप क्षीरसागर (MLA Sandeep kshirsagar) यांच्या नावाची एकच चर्चा रंगली आहे. आमदार महोदय चक्क झाडावर चढल्यानं त्यांच्या नावाची चर्चा झाली नसती तरच नवल! आंदोलक महिलांना झाडावरुन उतरवण्यासाठी आमदार महोदयांनी स्वतः झाडावरुन चढून आंदोलक महिलांना विनंती केली. यानंतर त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. अखेर वाद मिटला. आणि आंदोलन महिलांनीही आमदारसाहेबांचं ऐकून झाडावरुन खाली उतरत आपल्या मागण्या मान्य झाल्याबाबत समाधान व्यक्त केलं. बीड नगर परिषदेच्या महिलांनी (Beed Nagar Parishad) झाडावर चढून आंदोलनाला सुरुवात केली होती. झाडावर चढलेल्या बीड नगर परिषदेच्या कर्मचारी आंदोलक महिलांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. कर्मचारी आंदोलक महिला झाडावर चढल्याचं पाहून धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) चांगलेच संतापले. याचवेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागरही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले होते. अखेर त्यांनी हे आंदोलन मिटवण्यासाठी थेट झाडावर चढत महिलांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न केला.

झाडावर चढले, आंदोलन मिटवले

बीड जिल्ह्यात नात्यांचं राजकारण काही नवं राहिलेलं नाही. एकीकडे ताई-दादा तर दुसरीकडे काका-पुतण्या असा संघर्ष बीडमधील जनतेनं पाहिलेला आहे. अशातच बीडमधील नगराध्यक्ष काका भारतभूषण क्षीरसागर यांनी कामगारांचं वेतन रखडवल्याचा आरोप केला जात होता. वेतन रखडल्यामुळे त्रस्त झालेल्या आणि संसार कसा करायचा, या विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अखेर आंदोलन सुरु केलं. याच दरम्यान, बीड नगरपरिषदेच्या दोन सफाई कर्मचारी महिला थेट झाडावरच चढल्या. आपल्या मागण्या पूर्ण केल्या जाव्यात, वेतन मिळावं, यासाठी त्यांनी झाडावर चढून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

दरम्यान, या आंदोलनाबाबात कळताच बीडचे पालकमंत्री आणि बीडचे आमदार असे दोन्हीही नेते आंदोलनाच्या ठिकाणी हजर झाले. यावेळी महिला झाडावर चढल्याचं पाहून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे चांगलेच संतापले होते. तर दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर हे स्वतःच थेट झाडावर चढले. झाडावर चढून आमदार महोदयांनी महिलांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यांची कशीबशी समजूत घातली.

चर्चा तर होणारच!

अखेर महिलांचं मनधरणी करुन त्यांना खाली उतरण्याची विनंती आमदार क्षीरसागर यांनी केली. महिलांनीही अखेर आमदार महोदयांचं ऐकलं. त्याही झाडावरुन खाली उतरल्या. तो पर्यंत धनंजय मुंडे यांनीही नेमक्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वस्त केलं. दरम्यान, एकूणच महिलांची समजूत काढण्यासाठी झाडावर चढलेल्या आमदार महोदयांची मात्र संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

VIDEO: टिपू सुलतान देश गौरव होऊच शकत नाही, मुंबई महापालिकेच्या वादात फडणवीसांची उडी

कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक सांगतोय, फडणवीस का संतापले?

मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युती होणार? जाणून घ्या भाजपच्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.