Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#झुकेगा नही साला… 27 कोटींच्या फसवणुकीचे आरोप असलेल्या सुरेश धस यांचे सोशल कँपेन, मैं हू डॉन वर तुफान ढोलबाजी!

बीडः बीड विधान परिषदेचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर मुंबै बँकेकडून (Mumbai Bank Fraud) बेकायदेशीर रित्या कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याने राज्य सराकारच्या सहकार विभागाने कारवाईचे आदेश दिले असून राज्यात मोठी खळबळ माजली आहे. मात्र आमदार सुरेश धस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणताही […]

#झुकेगा नही साला... 27 कोटींच्या फसवणुकीचे आरोप असलेल्या सुरेश धस यांचे सोशल कँपेन, मैं हू डॉन वर तुफान ढोलबाजी!
Image Credit source: ट्विटर
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 12:51 PM

बीडः बीड विधान परिषदेचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर मुंबै बँकेकडून (Mumbai Bank Fraud) बेकायदेशीर रित्या कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याने राज्य सराकारच्या सहकार विभागाने कारवाईचे आदेश दिले असून राज्यात मोठी खळबळ माजली आहे. मात्र आमदार सुरेश धस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणताही गैरव्यवहार केला नसून राज्य सरकारला काय चौकशी करायचीय, ती करू द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांतून दिली होती. हीच भूमिका आणखी प्रभावीपणे मांडण्यासाठी सुरेश धस यांनी सोशल मीडियातून मोठे कँपेन सुरु आहे. #झुकेगा नही साला… (Zukega Nahi) असे हॅश टॅग वापरत त्यांनी मैं हू डॉन गाण्यावर ढोल वाजवतानाचा व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओ महाराष्ट्रात तुफ्फान व्हायरल होत आहे.

 काय आहेत आरोप?

मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सहकार खात्यातर्फे देण्यात आले आहेत. बोगस दस्तावेजांच्या आधारे सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीला 27 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे. आमदार सुरेश धस यांच्या जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदेपत्री उद्योगांना हे कर्जवाटप करण्यात आले होते, त्यासाठी बोगस कागदपत्र तयार करण्यात आले असा आरोप आहे. त्यामुळे धस आणि त्यांच्या पत्नीवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आरोपींना हे सर्व आरोप फेटाळले असून आपल्याला या चौकशीची पर्वा नाही, अशी प्रतिक्रिया काल प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांनी दिली होती.

मै हूं डॉन.. तुफ्फान ढोलबाजी

बीडमधील राजकारणाची एक खास शैली आहे. येथील राजकीय नेते आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अफलातून व्हिडिओ करत ते व्हायरल करतात. यासाठी राजकारण्यांची सोशल मीडियाची मोठी टीम तैनात असते. आमदार संदीप क्षीरसागर यांचा काही दिवसांपूर्वीचा पुष्पाचा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता. आता काल गैर व्यवहारांचे आरोप झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनीही धडाक्यात सोशल कँपेनिंग सुरु केले असून झुकेगा नही साला असे हॅशटॅग वापरत मै हू डॉन गाण्यावर ढोल वाजवतानाचा व्हिडिओ टाकला आहे. हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात तुफान फिरत आहे.

इतर बातम्या-

केंद्रीय एजन्सी या भाजपच्या प्रचार यंत्रणा, महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही- आदित्य ठाकरेंचा पलटवार!

Women’s Day | त्याच्याएवढंच काम करताय, पण पगार बरोबरीचा नाही? कुठे करणार तक्रार? समान वेतन कायदा काय?

सोबतच्या महिलांना Happy Women’s Day म्हणताय? जरा थांबा, त्यांना नेमकं काय हवंय, तेही जाणून घ्या!

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.