बीड : बीडमध्ये राजकीय नेत्याचा वाढदिवस (Beed political) जल्लोषात साजरा करण्याची पद्धत आहे. अनेकदा यात बडेजावपणा येतो तर तलवारीने केक कापण्यापर्यंत विकृतींचे दर्शन घडते. मात्र या प्रथांना फाटा देत बीडचे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक अण्णा रोमन यांनी आपल्या नेत्याचा वाढवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये सध्या सेवा सप्ताह सुरु आहे. याच दरम्यान त्यांचे कार्यकर्ते आणि अशोक रोमन यांनी बीडजवळील ढेकनमोहा इथल्या पसायदान (Pasaydaan) अनाथालयाला भेट दिली. येथील मुलांसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच मुलांसोबत अतिशय उत्साहात सर्व कार्यकर्त्यांनी होळी साजरी केली. यावेळी मुलांच्याही आनंदाला उधाण आले होते.
पसायदान अनाथलायातील मुलांना तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी पिचकाऱ्या ,रंग आणि मिठाईचे वाटप केले.
मुलांसोबत लहान होऊन या कार्यकर्त्यांनी होळीचा आनंद साजरा केला. बीडमध्ये कार्यकर्त्यांनी या मुलांसोबत उत्साहात होळी खेळली. तसेच मुलांसोबत झिंगाट गाण्यावर डान्सही केला. सलग दोन वर्ष कोरोनामुळे या मुलांनी होळी साजरी केली नव्हती. यंदा मात्र कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर मुलांना अशा प्रकारे होळी साजरी करता आली. त्यामुळे त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
VIDEO | अनाथ मुलांवर रंगांची बरसात, बीडच्या आमदारांचा अनोखा वाढदिवस, ‘झिंगाट’ने उत्साहाला उधाण!#Beed #Birthday pic.twitter.com/n5L5GmyG2H
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2022
इतर बातम्या-