हॅलो धनंजय मुंडे बोलताय…; छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ मुंडेंनाही धमकीचा फोन, राजकीय वर्तुळात खळबळ

Dhananjay Munde threatening phone call : छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन; केली लाखो रुपयांची मागणी

हॅलो धनंजय मुंडे बोलताय...; छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ मुंडेंनाही धमकीचा फोन, राजकीय वर्तुळात खळबळ
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 1:16 PM

परळी, बीड : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला धमकीचा फोन आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. या धमकीच्या फोनमध्ये लाखो रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन

मंत्री धनंजय मुंडे यांना फोनवरून धमकावल्याचं समोर आलं आहे. या फोनवरून मुंडे यांना धमकी देण्याबरोबरच पैशांचीही मागणी करण्यात आली आहे. 50 लाख रूपये द्या अन्यथा…, असं म्हणत धनंजय मुंडे यांना फोन आला आहे.

धनंजय मुंडे यांना आलेल्या धमकी प्रकरणी पोलिसात तक्रार केली जाईल, अशी माहिती आहे. मात्र सध्यातरी मुंडेंना धमकी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात धमकीच्या फोनचीच चर्चा होतेय. याआधी मंत्री छगन भुजबळ यांनाही धमकीचा फोन आला आहे.

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर धमकीचा फोन आला होता. या फोनवर भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत. तशी सुपारी आपल्याला मिळाली आहे, असं तो तरूण सांगत होता.

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलिसांकडून तपास केला जात आहे. या तपासात पुण्यातील एका तरूणाला पुणे पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे. तसंच भुजबळांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आघाडीवर होतं. अजित पवार यांनी जेव्हा 5 जुलैला समर्थक आमदारांची बैठक बोलावली होती. तेव्हा या बैठकी दरम्यान धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची बाजू खंबीरपणे मांडली.

अजित पवार यांच्यावर कसा अन्याय झाला हे धनंजय मुंडे यांनी या भाषणातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक अन्याय कुणावर झाला असेल तर तो अजितदादांवर.., असं धनंजय मुंडे म्हणाले. त्यांच्या या दमदार भाषणाची महाराष्ट्रभर चर्चा झाली. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांना थेट धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.