Breaking | धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार! पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार

मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला रात्री अपघात झाला.

Breaking | धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार! पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 10:55 AM

संभाजी मुंडे, परळीः बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री परळीत ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असली तरीही  त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Dhananjay Munde Accident

कुठे घडली घटना?

अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.

Dhananjay Munde Accident (1)

अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्यांच्या छातीला मार लागली आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे.

Dhananjay Munde accident

त्यांच्या छातीला मार लागल्याची माहिती डॉक्टरांनी टीव्ही9 ला दिली आहे. पुढील उपचारांसाठी धनंजय मुंडे यांना मुंबईत हलवणार आहेत.

Munde accident

धनंजय मुंडे यांना परळीतून लातूर येथे नेलं जाईल. त्यानंतर विशेष विमानाने त्यांना मुंबईत पुढील उपचारांसाठी हलवलं जाईल, अशी माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी टीव्ही 9 ला दिली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, विश्रांतीचा सल्ला

धनंजय मुंडे यांच्या गाडीला रात्री तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला, मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती. आज सकाळी अपघाताची बातमी शहरभर पसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय अन् तरुण नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. तर सध्या भाजपातील नेत्या पंकजा मुंडे यांचे ते चुलत भाऊ आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.