Ram Mandir | ‘…तर अल्लाह आपली मदत…’, राम मंदिर उद्घाटनाआधी असदुद्दीन ओवैसी यांचं मोठ वक्तव्य

| Updated on: Jan 15, 2024 | 11:34 AM

Ram Mandir | "मशिदीत एकटे जाऊ नका. तुमच्या मुलालाही सोबत घेऊन जा. फक्त जुम्याच्या दिवशीच नाही, प्रत्येकवेळी मशिदीतच नमाजपठण केलं पाहिजे. आपल्या मशिदी राहिल्या पाहिजेत, वेळ अशी आहे की, आपण आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात लढतोय"

Ram Mandir | ...तर अल्लाह आपली मदत..., राम मंदिर उद्घाटनाआधी असदुद्दीन ओवैसी यांचं मोठ वक्तव्य
aimim chief asaduddin owaisi
Follow us on

Ram Mandir | अयोध्येत रामललाची प्राण प्रतिष्ठा होण्याआधी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच एक मोठ वक्तव्य समोर आलं आहे. एकासभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवैसी यांनी मशिदींच संरक्षण करण्याच अपील केलय. “सध्याच्या परिस्थितीत मशिदी उद्धवस्त करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. मशिदींच महत्त्व कमी करण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न आहे”

“मुस्लिमांना इस्लामपासून दूर करण्याची देशातील सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे मशिदींच संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. आधीच आपण एक मशिद गमावलीय. अजूनही ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही, तर खुर्चीवर बसलेल्या लोकांची नजर आपल्यावर आहे. त्यांना माहितीय मुस्लिमांना मशिदीपासून दूर केल्यास त्यांच्याकडे काही राहणार नाही” ओवैसीचा हा व्हिडिओ AIMIM ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलाय.

‘मशिदींवरील अजान संपवण्याच्या मागे लागलेत’

“तुम्ही जेव्हा मशिदीत जालं, तेव्हा एकटे जाऊ नका. तुमच्या मुलालाही सोबत घेऊन जा. फक्त जुम्याच्या दिवशीच नाही, प्रत्येकवेळी मशिदीतच नमाजपठण केलं पाहिजे. आपल्या मशिदी राहिल्या पाहिजेत, वेळ अशी आहे की, आपण आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात लढतोय. हे लोक आपल्या मशिदींवर अजान संपवण्याच्या मागे लागले आहेत” असं या व्हिडिओमध्ये ओवैसींनी म्हटलय.


‘….तर अल्लाह आपली मदत जरुर करेल’

“यावेळी तुम्ही, मी सोबत उभे राहिलो, तर अल्लाह आपली मदत जरुर करेल” अस ओवैसी म्हणालेत. याआधी ओवैसीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ते असच काहीतरी बोलताना दिसले होते. अयोध्येत 22 जानेवारीला रामललाची प्राण प्रतिष्ठा होईल. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे.