बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावला जाणार

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे (Sanjay Raut Maharashtra Ekikaran Samiti )

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावला जाणार
शुभम शेळके आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 12:57 PM

मुंबई : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत (Belgaum Loksabha Bypoll) महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) बेळगावला जाणार आहेत. खुद्द संजय राऊतांनी ट्विटरद्वारे याविषयी माहिती दिली. (Belgaum Loksabha Bypoll Shivsena MP Sanjay Raut Supports Maharashtra Ekikaran Samiti candidate Shubham Shelke)

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. संजय राऊत बुधवारी सकाळी बेळगावात दाखल होतील. त्यानंतर त्यांचा रोड शो होईल. संध्याकाळी रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रीज जवळ असलेल्या मराठा मंदिर हॉलमध्ये राऊत जाहीर सभेला मार्गदर्शन करतील.

“बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समीतीचे उमेदवार शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेनेचा त्यांना पाठिंबा आहे. मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी 14 तारखेला बेळगावला पोहोचत आहे.” असे लिहित संजय राऊत यांनी उमेदवाराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये काय?

“आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भाजपची बैठक सुरु आहे. प्रत्येक गाडीस्वाराला पाचशे रुपये आणि पेट्रोल दिलं जात आहे. इथल्या लोकांना विचारा, कुणाला एक नवा पैसा मिळाला आहे का? ही आहे महाराष्ट्र एकीकरण समिती. एका सन्माननीय व्यक्तीने काहीतरी गणित घातलेलं कानावर आलं. गेल्या विधानसभेला सगळ्या मतदारसंघातून मिळून सत्तर हजार मतं यांना पडली. आम्ही याआधीही जिंकलोय आणि आताही आमचा विजय निश्चित आहे” असं उमेदवार या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. (Sanjay Raut Maharashtra Ekikaran Samiti )

कोण होते सुरेश अंगडी?

सुरेश अंगडी यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2004 मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तत्कालीन खासदार अमरसिंग पाटील यांचा पराभव करून अंगडी लोकसभेवर निवडून गेले.

सुरेश अंगडी यांच्या विजयात मराठी मतांचा वाटा सर्वाधिक होता. 2004 पाठोपाठ 2009 आणि 2014 मध्येही त्यांना मराठीबहुल भागात सर्वाधिक मते मिळाली. 2019 मध्ये मराठीबहुल भागात त्यांचे मताधिक्‍य कमी होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना उलट त्यांचे मताधिक्‍य वाढले.

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी रिंगणात कोण?

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

संबंधित बातम्या 

Karnataka bypolls : कर्नाटकात 15 जागांसाठी पोटनिवडणूक, भाजपला 8 जागी विजय आवश्यक!

(Belgaum Loksabha Bypoll Shivsena MP Sanjay Raut Supports Maharashtra Ekikaran Samiti candidate Shubham Shelke)

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....