अमेरिकेपेक्षाही 2024 पर्यंत या राज्यात चांगले रस्ते, 5 लाख कोटींची गुंतवणूक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा

| Updated on: Oct 10, 2022 | 8:30 AM

2024 पर्यंत रस्त्यांचा दर्जा हा अमेरिकेपेक्षाही अधिक चांगला असेल असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ते शनिवारी इंडियन रोड काँग्रेसच्या 81 व्या अधिवेशनात बोलत होते.

अमेरिकेपेक्षाही 2024 पर्यंत या राज्यात  चांगले रस्ते, 5 लाख कोटींची गुंतवणूक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा
Image Credit source: social media
Follow us on

लखनौ : 2024 पर्यंत उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) रस्त्यांचा दर्जा हा अमेरिकेपेक्षाही अधिक चांगला असेल असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. ते शनिवारी इंडियन रोड काँग्रेसच्या (Congress) 81 व्या अधिवेशनात बोलत होते. इंडियन रोड काँग्रेसच्या 81 व्या अधिवेशनाचं उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी सहभागी झाले होते. या अधिवेशनाला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून,11 ऑक्टोबरला या अधिवेशनाची सांगता होणार आहे. या अधिवेशनामध्ये रस्ते निर्माणशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सुमारे 2500 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. उत्तर प्रदेशला पाचव्यांदा या अधिवेशनाचे यजमानपद मिळाले आहे.

गडकरी नेमकं काय म्हणाले?

या अधिवेशनात संबोधित करताना नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, राज्यात 2024 पूर्वी एकूण पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून उत्तर प्रदेशमधील पायाभूत विकासाला चालना मिळणार आहे. यामध्ये शाहाबाद बायपास ते हरदोई बायपास 1212 कोटी रुपये, शाहजहापूर ते शाहाबाद बायपास 950 कोटी रुपये, मुरादाबाद ते काशीपूर राष्ट्रीय महामार्ग 2007 कोटी रुपये, गाजीपूर ते बालिया महामार्ग 1708 कोटी रुपये आणि 13 रेल्वे पूल यांचा समावेश असणार आहे. तसेच या व्यतिरीक्त देखील अनेक योजनांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

पर्यावरणाला धक्का न पोहोचवता विकास

पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, हे गरजेचं नाही की तुमच्याकडे असेल ते सर्वच बेस्ट असावे, आपण उत्तर प्रदेशमधील पर्यावरणाला हानी न पोहोचवता या रस्त्यांची निर्मिती करणार आहोत. इकोनॉमी सोबतच इकोलॉजीकडे देखील लक्ष देणे आवश्यक असल्याचं या आधिवेशनात बोलताना गडकरी यांनी म्हटलं आहे.