पंढरपूर : “पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची (Pandharpur Mangalvedha bypoll) काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा कार्यक्रम आमचं आम्ही करतो”, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. (Bhagirath Bhalke will definitely win in Pandharpur Mangalvedha bypoll Jayant Patil assures Sharad Pawar)
शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे 31 मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवार पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले, “शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सल्ल्याने ते बाहेर पडतील. या मतदारसंघाची काळजी करु नका असं सांगितलं आहे. प्रचाराला कोण नेते येतील याचं नियोजन लवकरच होईल”
सगळ्यांशी चर्चा करुन भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. वातावरण चांगलं आहे. विजय निश्चित आहे. बंडखोरी झाली असली तरी त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे अर्ज माघरीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सर्व कायकर्ते घराघरात जाऊन प्रचार करतील, कोरोना काळ असला तरी अनेक राज्यात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक आणि उमेदवार समाधान अवताडे दोघांनी एकमेकाविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असं वाटत नाही. त्या दोघांचे अनेक कार्यकर्ते भगीरथ भालके यांच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
जप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं लॉकडाऊनला विरोधातील वक्तव्य बेजबदारपणाचं आहे. लॉकडाऊनबाबत मध्य काढून निर्णय होईल. सर्वसामान्य माणसाला याचा त्रास होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकमताने निर्णय घेतो. आम्हा तिघात भांडण लावण्याचा उपद्वाप चंद्रकांत दादा आणि त्यांचे सहकारी करत आहेत, मात्र त्यांना यश येणार नाही, असं जयंत पाटलांनी नमूद केलं.
दरम्यान, भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचाही उमेदवारी अर्ज आज दाखल होत आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. शेतकरी प्रश्नावर आम्ही ही निवडणूक लढू, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र
भारत भालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा
दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात कामाचा अनुभव
भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे भगीरथ भालकेंना तिकीट देण्यासाठी काही कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र भगीरथ भालके यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या निवडून येण्याची शक्यता अधिक असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याचीही चाचपणी झाली. परंतु अखेर भगीरथ भालके यांनाच संधी देण्याचं ठरलं.
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.
भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.
अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
>> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
>> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
>> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
>> मतदान – 17 एप्रिल 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे 2021
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोललं जात आहे.
पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
समाधान आवताडे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत
मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीतही अपक्ष उतरण्याची आवताडेंनी तयारी केली होती
आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी
संबंधित बातम्या
Pandharpur Assembly By-Election : राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर
पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?
(Bhagirath Bhalke will definitely win in Pandharpur Mangalvedha bypoll Jayant Patil assures Sharad Pawar)