मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर आज सकाळी ईडीने धाड टाकल्याने एकच गोंधळ उडालायं. ईडीच्या कारवाईवर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास आता सुरूवात झालीयं. यावर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी आपली प्रतिक्रिया (Reaction) दिलीयं. संजय राऊत यांची चौकशी ईडी मार्फत सुरू आहे. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, संजय राऊत यांनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. संजय राऊत यांची चौकशी आणि ईडी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, जे कोणी शिवसेनेचे नेते भाजपवर आरोप करत असतील ते चुकीचे आहे त्यांच्या आरोपांचे मी खंडन करतो, असे भागवत कराड म्हटले आहेत.
राऊतांच्या घरावर सकाळी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत, तेथे अजूनही कारवाई सुरूच आहे. यादरम्यान विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी भाजपाकडूनच ही कारवाई सुरू असल्याचा आरोप सातत्याने शिवसेनेकडून केला जातोयं. यावर आता भागवत कराड यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले असून माध्यमांशी बोलताना कराड म्हणाले आहेत की, संजय राऊत यांची चौकशी ईडी मार्फत सुरू आहे ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, संजय राऊत यांनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. संजय राऊत यांची चौकशी आणि ईडी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही.
यासर्व प्रकरणावर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून राणा म्हणाल्या की, पापाचा घडा भरला की तो फुटतोच. दरम्यान नवनीत राणा यांनी एक मोठे विधान केले असून त्या म्हणाल्या की, संजय राऊत यांना अटक होणार आहे. संजय राऊत हे 25 कंपनीत भागीदार असल्याचाही गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केलायं. पुढे बोलताना राणा म्हणाल्या की, ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती. संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याचे कळताच शिवसैनिक राऊतांच्या घराबाहेर जमले असून तेथे ते आंदोलनही करताना दिसत आहेत. शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करताना देखील दिसत आहेत.