भागवत कराड पंकजाच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रितमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, यात्रेआधीच राडा

| Updated on: Aug 16, 2021 | 10:28 AM

पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन रोष व्यक्त केला.

भागवत कराड पंकजाच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रितमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, यात्रेआधीच राडा
केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप नेत्या पंकजा मुंडे
Follow us on

परळी : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत आहे. ही यात्रा बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावरुन (Gopinath Gad) निघणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

जन आशीर्वाद यात्रेला थोड्याच वेळात सुरवात

परळीच्या गोपीनाथ गडावरून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला थोड्याच वेळात सुरवात होणार आहे. स्वतः पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यात सहभागी होणार आहेत. दरम्यान काही वेळातच या यात्रेचा शुभारंभ गोपीनाथ गडावर होणार असून त्याचीच तयारी सध्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळी सुरु आहे.

पंकजा मुंडे यांच्या घरासमोर गोपीनाथ मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावरुन पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये रोष कायम असल्याचं दिसून येत आहे.

पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न

भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र यावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे. कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम आहे. ही मुंडे यांच्याविषयीची भावना आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

स्थान न दिल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. याच चर्चेनंतर मुंडे भगिनींच्या समर्थकांनी राजीनामासत्र सुरु केले होते. राजीनामासत्रांचा एक अंक संपल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. पंकजा यांची नाराजी दूर करण्यासाठीच यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरुन सुरु होत असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना “कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम व त्यांच्या विषयीची भावना आहे. त्यामुळेच कराड ही यात्रा गोपीनाथ गडावरुन काढत आहेत. गोपीनाथ मुंडे आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे,” असं पंकजा यांनी म्हटलंय.

6 ते 21 ऑगस्टदरम्यान कराडांची यात्रा

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. “भव्य जनआशिर्वाद यात्रा… दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021 , मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलंय. भागवत कराड आज केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचं लोक म्हणतात.

(Bhagwat Karad Arrived Pankaja Munde house, munde Supporters shout slogans in support of Pankaja-Pritam Munde over janashirvad yatra)

हे ही वाचा :

नाराजी दूर करण्यासाठीच भागवत कराडांची गोपीनाथ गडावरून यात्रा ? चर्चेवर पंकजा मुंडेंचे उत्तर, म्हणाल्या…