Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड?

भाई जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होणार असल्याचंही समजतं.

Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड?
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 1:27 PM

नवी दिल्ली : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी (Mumbai Congress President) विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांची निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाई जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होणार असल्याचंही समजतं. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. (Bhai Jagtap becomes Mumbai Congress President)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अध्यक्षपदासाठी वेगवेगळे नेते जोरदार लॉबिंग करत होते. त्यात मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड यांचाही समावेश होता. मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली होती. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh), एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिल्लीवारी केली होती. त्यात आता भाई जगताप यांनी बाजी मारल्याचं दिसत आहे.

कोण आहेत भाई जगताप?

अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार. जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्म भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव

विशेष म्हणजे भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली आहे. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची निवड जवळपास निश्चित करुन मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. आगामी मुंबई पालिका निवडणूक ही मराठी विरूद्ध मराठी विरूद्ध मराठी नेते अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.

दिल्लीत खलबतं

महाराष्ट्रामधील संघटनात्मक फेरबदलावर काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल, आशिष दुवा, महाराष्ट्र प्रभारी सचिव उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये संघटन फेरबदल आणि जिल्ह्याध्यक्ष बदलावर चर्चा झाली. जानेवारीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष बदलणार आहे. (Bhai Jagtap becomes Mumbai Congress President)

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण होते?

भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यासह माजी आमदार चरणसिंह सप्रा (Charansingh Sapra), माजी मंत्री सुरेश शेट्टी (Suresh Shetti) यांची नावं मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.

संबंधित बातम्या :

मुंबई कुणाची ? गायकवाड, जगताप की आणखी कोण ?

काँग्रेस पुन्हा फिरुन तिथेच? राहुल गांधी अध्यक्ष की प्रियंका?

(Bhai Jagtap becomes Mumbai Congress President)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.