Bhandara : भंडारा जिल्ह्यात तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी पूरात वाहून गेला, एकाला वाचवण्यात नागरिकांना यश

भंडारा जिल्ह्यात सद्धा झालेल्या अतिवृष्टिमुळे नदी-नाले ओसांडून वाहत असून तुमसर तालुक्यातील मोजा सिलेगाव येथील सिलेगाव-वाहनी नाल्यावरील पुलावरून ही पाणी वाहत आहे.

Bhandara : भंडारा जिल्ह्यात तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी पूरात वाहून गेला, एकाला वाचवण्यात नागरिकांना यश
Bhandara : भंडारा जिल्ह्यात तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी पूरात वाहून गेला, एकाला वाचवण्यात नागरिकांना यश Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 8:44 PM

मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर देखील आला आहे. आत्तापर्यंत अनेकजण पूरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पूराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात पूराच्या पाण्यातून वाहून जाताना एकाला वाचवले आहे. तर एकजण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना घडल्यापासून परिसरात एकदम शांतता पसरली आहे. ही घटना घडली त्यावेळी तिथं अनेक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी तिथल्या नागरिकांनी वाहत जात असलेल्या एकाचा वाचवले. ही घटना सिलेगाव वाहनी पुलावरील आहे.

तहसिहदार कार्यालयातील कर्मचारी वाहून गेला

नाल्यावरील पुलावरुण पाणी वाहत असताना सुद्धा जबरदस्तीने पुल ओलांडल्याचे प्रयत्न दुचाकी वरील दोघांना चांगले महागात पडले आहे. पुल ओलांडण्याचा प्रयत्न एक वाहुन तर एक बचावल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिलेगाव -वाहनी पुलावर घडली आहे. श्यामा सांगोडे वय 50 वर्ष असे पुरात वाहुन गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते तिरोडा तहसीलमध्ये कार्यालयाचे कर्मचारी होते. तर विशाल गजभिये वय 43 वर्ष असे बचावलेल्या व्यक्तिचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा

लोकांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश

भंडारा जिल्ह्यात सद्धा झालेल्या अतिवृष्टिमुळे नदी-नाले ओसांडून वाहत असून तुमसर तालुक्यातील मोजा सिलेगाव येथील सिलेगाव-वाहनी नाल्यावरील पुलावरून ही पाणी वाहत आहे. दरम्यान विशाल गजभिये व श्यामा सांगोडे दोघे राहणार तिरोडा हे मोटर सायकल घेऊन निघाले होते. पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले असता पुलावर तैनात असलेल्या दोन होमगार्ड यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी न ऐकता मोटर सायकल नाल्यावरून काढायचा प्रयत्न केला. पुलावरून पाणी तीव्रतेने वाहत असल्याने पुलावरून मोटर सायकल घसरली व दोघे पाण्यात वाहू लागले. तिथे उपस्थितीत असलेल्या होमगार्ड च्या लक्ष्यात ही गोष्ट येताच नागरिकांच्या सहाय्याने धावतच जावून त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. परंतु यात विशाल गजभिये यांनाच वाचविण्यात त्यांना यश आले. तर दुसरा श्यामा सांगोडे हा पुराचे पाण्यात वाहून गेला. यांची माहिती सीहोरा पोलिसांना देण्यात आली असून वाहुन गेलेल्या व्यक्तीच्या शोध घेत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.