मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर देखील आला आहे. आत्तापर्यंत अनेकजण पूरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पूराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात पूराच्या पाण्यातून वाहून जाताना एकाला वाचवले आहे. तर एकजण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना घडल्यापासून परिसरात एकदम शांतता पसरली आहे. ही घटना घडली त्यावेळी तिथं अनेक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी तिथल्या नागरिकांनी वाहत जात असलेल्या एकाचा वाचवले. ही घटना सिलेगाव वाहनी पुलावरील आहे.
नाल्यावरील पुलावरुण पाणी वाहत असताना सुद्धा जबरदस्तीने पुल ओलांडल्याचे प्रयत्न दुचाकी वरील दोघांना चांगले महागात पडले आहे. पुल ओलांडण्याचा प्रयत्न एक वाहुन तर एक बचावल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिलेगाव -वाहनी पुलावर घडली आहे. श्यामा सांगोडे वय 50 वर्ष असे पुरात वाहुन गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते तिरोडा तहसीलमध्ये कार्यालयाचे कर्मचारी होते. तर विशाल गजभिये वय 43 वर्ष असे बचावलेल्या व्यक्तिचे नाव आहे.
भंडारा जिल्ह्यात सद्धा झालेल्या अतिवृष्टिमुळे नदी-नाले ओसांडून वाहत असून तुमसर तालुक्यातील मोजा सिलेगाव येथील सिलेगाव-वाहनी नाल्यावरील पुलावरून ही पाणी वाहत आहे. दरम्यान विशाल गजभिये व श्यामा सांगोडे दोघे राहणार तिरोडा हे मोटर सायकल घेऊन निघाले होते. पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले असता पुलावर तैनात असलेल्या दोन होमगार्ड यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी न ऐकता मोटर सायकल नाल्यावरून काढायचा प्रयत्न केला. पुलावरून पाणी तीव्रतेने वाहत असल्याने पुलावरून मोटर सायकल घसरली व दोघे पाण्यात वाहू लागले. तिथे उपस्थितीत असलेल्या होमगार्ड च्या लक्ष्यात ही गोष्ट येताच नागरिकांच्या सहाय्याने धावतच जावून त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. परंतु यात विशाल गजभिये यांनाच वाचविण्यात त्यांना यश आले. तर दुसरा श्यामा सांगोडे हा पुराचे पाण्यात वाहून गेला. यांची माहिती सीहोरा पोलिसांना देण्यात आली असून वाहुन गेलेल्या व्यक्तीच्या शोध घेत आहेत.