“जिथे-जिथे शिवसेनेचं कार्यालय, तिथे-तिथे ताबा मिळवणार”, शिंदेगटाचा दावा
आवश्यकता आहे तिथे-तिथे महाराष्ट्रातील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवण्याचा दावा शिंदेगटाकडून करण्यात आला आहे. नक्की काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : मुंबई महापालिकेत असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयावरून ठाकरेगट आणि शिंदेगटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. महापालिकेतील पक्ष कार्यालयावर (Shivsena Office) शिंदेगटाने ताबा मिळवला. त्यानंतर शिंदेगटाचे नेते भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जिथे आवश्यकता आहे महाराष्ट्रात तिथे-तिथे शिवसेना कार्यालयावर जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार आणि आम्ही ताबा मिळणार!”, असं भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणालेत.
आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे ठाकरेगटातील नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. अन्यथा आम्ही त्यांना आमच्या शैलीत समजावू, असं गोगावले म्हणालेत.
स्फोट करण्यासाठी शिवसेनेकडे दारुगोळा शिल्लक नाहीये. संजय राऊत बोलून दमले आहेत. उदय सावंतांनी सांगितलं की, आम्ही बॉम्बशोधक पथक आणलंय त्यामुळे हा स्फोट होऊ शकला नाही. मुंबईहून येऊन जर ते काय बोलू शकत नसतील तर त्यांच्या स्फोटातला दारूगोळा संपला आहे, हे स्पष्ट झालंय, असं गोगावले यांनी म्हटलंय.
माझ्याकडे स्पोट करण्यासारखी अनेक प्रकरणं आहेत. सभागृहामध्ये आता सगळे विषय मांडणार आहे. पार्ल्यापासून ब्रांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते तुम्ही बघाच, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ज्या त्यांनी चुका केलेल्या आहेत. त्याचं काहीही होऊ शकत नाही. सभागृहात विषय मांडल्यानंतर वास्तुस्थिती आणि समजेल आज आणि उद्या वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार बांद्रापासून पार्ल्यापर्यंत यांना फटाके वाजताना पाहायला मिळतील. यांचे अनेक घोटाळे आहेत. ही एक झलक आहे आणि झलक यांना पाहायला मिळेल, असं म्हणत गोगावले यांनी ठाकरे गटाला इशारा दिलाय.
कर्नाटक सीमाप्रश्न आणि मुंबईबाबतही भरत गोगावले बोलले.मुंबई कुणाच्या बापाची नाहीये मुंबई आणि महाराष्ट्रासाठी 105 जणांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे मुंबई यांनी जास्त बोलू नये. त्याला आम्ही दाखवून देऊ काल सभागृहात स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की त्यांनी एक इंच बोलला पण आम्ही अर्धा इंच ही जागा त्यांना देणार नाही. पण जे आहे ते सगळं घेण्याच्या तयारीत आम्ही आहोत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण त्या लोकांना काय सुविधा देऊ शकतो हे सांगितलेला आहे. त्याप्रमाणे कामही सुरु आहे, असं ते म्हणाले.
कर्नाटकने आगाऊपणा करू नये. सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. त्यातून जे समोर येईल त्यानंतर आम्ही आमची पावलं पुढे टाकू. मुंबई तर लांब राहिली पण त्यांनी कोल्हापूरचा पण नाव त्यांनी घेऊ नये, अशी तंबी गोगवले यांनी दिली.