नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिंदेगटाचे नेते साईबाबांच्या दर्शनाला, काय प्रार्थना केली? वाचा…
नवी ऊर्जा घेऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक सज्ज होत आहेत. राजकीय नेतेही त्यांला अपवाद नाहीत. शिंदे गटाचे नेते साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत पोहोचले आहेत.
शिर्डी : नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. अशात पर्यटनस्थळी, मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना अन् नव वर्षाचं स्वागत करताना अनेकजण धार्मिक स्थळी जाऊन मन प्रसन्न करत आहेत. नवी ऊर्जा घेऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक सज्ज होत आहेत. राजकीय नेतेही त्यांला अपवाद नाहीत. शिंदे गटाचे नेते (CM Eknath Shinde Group) साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत (Shirdi Sai Baba) पोहोचले आहेत.
शिंदे गटाचे नेते भरत गोगावले हे साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत आहेत. भरत गोगावले यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सहपरिवार साईदर्शन घेतलं. सरत्या वर्षाने नवीन सरकार दिलं. जनतेला अपेक्षित सरकार सत्तेत आलं. हे सरकार यावे हे ईश्वरादेखील मान्य असावं. हे सगळं देण्यासाठी साईंचं दर्शन घेतलं. आभार मानले, असं भरत गोगावले यावेळी म्हणाले.
येत्या वर्षात सरकार जनतेच्या हिताची कामं करण्यासाठी सज्ज आहे.विकासाला चालना देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. त्या चांगल्या कामासाठी ऊर्जा घेण्यासाठी साईंचं दर्शन घेतलं. आता नव्या उमेदीने कामाला लागायचंय, असं गोगावले म्हणाले.
धर्मवीर संभाजी महाराज यांचा विषय निघाला. त्यांना धर्मवीर ही पदवी दिली. देह गेला तरी धर्म बदलणार नाही असं छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला म्हणाले. त्यामुळे मी अजित पवार यांच्यांशी वादविवाद केला पण मला संधी मिळाली नाही, असं गोगावले म्हणालेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपला मोठं यश मिळालं. आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती , महानगरपालिका , नगरपालिका निवडणुकीतही हेच दिसेल. त्यानंतर आमदार खासदारीला दाखवून देवू खोके -बोके सगळं एकदम ओके करू…, असं गोगावले म्हणालेत.