अकोला जिल्हापरिषदेच्या चारही सभापती पदांवर ‘भारिप’चे वर्चस्व
भारिपने अकोला जिल्हा परिषदेत सभापती पदांच्या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवत चारही सभापती पदांवर कब्जा (Bharip performance in akola zilla parishad) केला.
अकोला : भारिपने अकोला जिल्हा परिषदेत सभापती पदांच्या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवत चारही सभापती पदांवर कब्जा (Bharip performance in akola zilla parishad) केला. यासंबंधीची निवडणूक प्रक्रिया गुरूवारी (30 जानेवारी) दुपारी साडेचार वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार (Bharip performance in akola zilla parishad) पडली.
जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान भाजपचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा कमी झाला. त्यामुळे भारिपने या निवडणुकीत 25 विरुद्ध 21 मतांनी विजय मिळवला. त्याआधी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत दुपारी एक वाजेपर्यंत भारिपच्या वतीने महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी मनीषा बोर्डे, समाज कल्याण सभापती पदासाठी आकाश शिरसाट आणि दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी पंजाबराव वडाळ आणि चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
महाविकास आघाडीकडून महिला आणि बालकल्याण सभापती पदासाठी काँग्रेसकडून अर्चना राऊत, समाज कल्याण सभापती पदासाठी शिवसेनेकडून डॉ. प्रशांत आढावू आणि विषय समिती सभापती पदांसाठी राष्ट्रवादीकडून सुमन गावंडे आणि अपक्ष गजानन फुंडकर यांनी अर्ज दाखल केले होते.
निवडणूक प्रक्रिया अंतर्गत दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानादरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 21 सदस्यांनी मतदान केले तर भारिप बहुजन महासंघाच्या 25 सदस्यांनी मतदान केले. मतदानानंतर विजयी उमेदवारांचे नाव जाहीर करताच भारिपच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा परिषदेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अकोला जिल्हा परिषद निकाल
जिल्हा परिषद एकूण जागा 53
- भारिप बहुजन महासंघ : 22
- शिवसेना : 12
- भाजप : 07
- राष्ट्रवादी : 03
- काँग्रेस : 05
- अपक्ष : 04