शहाजीबापू पाटील पुढच्या दोन वर्षात घरी बसणार- भास्कर जाधव
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव सध्या परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
परभणी : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) सध्या परभणी दौऱ्यावर आहेत. हिंगोली दौऱ्यासाठी जात असताना परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी जात त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संदीपान भुमरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) पुढच्या दोन वर्षात घरी बसणार, असं भास्कर जाधव म्हणालेत. निधी वाटपात दुजाभाव होत असल्याने विधानसभेत बोलणार असल्याचं जाधव यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांना सदा सरवणकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी बोलणं टाळलं.