रत्नागिरी : देशात दंगली घडवण्याचे काम भारतीय जनता पार्टीने (BJP) केलं आहे. गुहागर मधील शिवसेना मेळाव्यात जाधव बोलत होते, त्यावेळी त्यांनी भाजपवरती थेट आरोप केले. मागच्या काही दिवसांपासून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत भाजपवरती अनेकदा जोरादार टीकास्त्र केले आहे. जिथं जिथं भाजपची सत्ता आहे, तिथं तिथं दंगली झाल्या आहेत असा इतिहास असं मोठं वक्तव्य देखील भास्कर जाधव यांनी केलं. आज शिवसेनेच्या (Shivsena) एका मेळाव्यात बोलत होते. एकनाथ शिंदेसह अनेक आमदारांनी आपली वेगळी भूमिका मांडल्यापासून शिवसेना राज्यात बैठका घेत आहे. मुंबई पालिकेसाठी भाजप दंगल घडवेल असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केल्यापासून राज्यात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आत्तापासून पालिकेच्या अनुशंगाने राजकीय नेत्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपच्या काही नेत्यांनी आत्तापासून मुंबई महापालिकेतील काही गोष्टी चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली आहे. त्यामुळे होणारी निवडणुक अगदी संघर्षाची होईल अशी चिन्ह दिसत आहेत.
आज झालेल्या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी अनेक मोठी विधानं केली आहेत. भाजपाने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवनीत राणा यांना पुढे केलं. त्याचबरोबर सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत अशी अनेक नावे घेतली. भाजपने आत्तापर्यंत अनेक नेत्यांना ईडीची भीती दाखवली आहे. तसेच राजकारण तापवत असताना कुणाच्या हातात हनुमान चाळिसा दिली असा आरोप भास्कर जाधव यांच्यावरती केला.
महाराष्ट्रात आमचं सरकार आलं आणि हिंदुचे सगळे सण साजरे व्हायला लागले आहेत असा अप्रचार सध्या राज्यात सुरु आहे. कारण कोरोनाच्या काळात आमच्या सरकारने संसर्ग अधिक पसरु नये म्हणून आमच्या सरकारनी निर्बंध लादले होते असंही त्यांनी वक्तव्य केलं. आमच्या सरकारच्या काळात सुध्दा अनेक सण साजरे झाले आहेत असं भास्कर जाधव यांनी उपस्थितांना सांगितलं.