मोबाईल बंद करुन भावना गवळींची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

यवतमाळ : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेमधून फक्त दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनाच संधी देण्यात आली आहे. पण मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी शपथविधीला उपस्थित नसतील. शिवाय त्यांचा फोनही बंद आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भावना गवळी नाराज झाल्याची माहिती आहे. शिवसेनेतून कुणाला मंत्रिपद दिलं […]

मोबाईल बंद करुन भावना गवळींची शपथविधी सोहळ्याकडे पाठ
Bhavana Gawali
Follow us
| Updated on: May 30, 2019 | 5:11 PM

यवतमाळ : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेमधून फक्त दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनाच संधी देण्यात आली आहे. पण मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी शपथविधीला उपस्थित नसतील. शिवाय त्यांचा फोनही बंद आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भावना गवळी नाराज झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेतून कुणाला मंत्रिपद दिलं जातं याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पण यामुळे ग्रामीण भागातील खासदार नाराज असल्याचं कळतंय. भावना गवळी या सलग पाचव्यांदा निवडून आल्या आहेत. तरीही त्यांना डावलण्यात आल्याने त्यांची निराशा झाली असण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

भावना गवळी सलद पाचव्यांदा लोकसभेवर

भावना गवळी यांनी काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा तब्बल सव्वा लाख   मतांनी पराभव करून शिवसेनेचा हा गड कायम राखला. तर्कवितर्क आणि अफवांना पूर्णविराम देत, निकाल पूर्णपणे आपल्याकडे झुकवून भावना गवळी यांनी या मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयाची नोंद केली. संपूर्ण देशात दिसणाऱ्या ‘नमो’ लाटेने विदर्भात काँग्रेस आघाडीचा जो सुपडासाफ केला त्याला यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघही अपवाद ठरला नाही.

एकीकडे दिग्गज आणि मुरब्बी राजकारण्यांची फळी, तर दुसरीकडे विश्वासू तरुणाईची नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा या बळावर भावना यांनी संपूर्ण प्रचार राबविला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ग्रामीण स्तरावर पोहोचलेले जाळे आणि त्यांच्या नेत्यांची करडी नजर यातून माणिकराव ठाकरे यांचा विजय होणार असा दावा करण्यात येत होता. पण मतदारराजाच्या मनात ‘नमो’ लाट आणि दांडगा जनसंपर्क असणाऱ्या नेतृत्वाबद्दलची ममतेची ‘भावना’ यातूनच अशक्यप्राय वाटणारा हा विजय भावना गवळी यांनी खेचून आणला.

खासदार भावना गवळी यांच्या विजयासाठी वाशिम – यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जीवाचं राण केलं होतं. योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही असे म्हटले जाते. विविध घटना तसेच अनुभवावरून हे वेळोवेळी सिद्ध झालेले आपण पाहतो. सलग पाचव्यांदा  खासदार म्हणून विराजमान झालेल्या भावना गवळी या सुद्धा राजयोग घेऊनच जन्माला आल्याचं दिसून येत आहे. त्यांचे वडील माजी खासदार स्व. पुंडलीकराव गवळी यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेऊन वयाच्या 24 व्या वर्षी 19999 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या, यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाच लोकसभा निवडणुकात विजय मिळविला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.