‘भीम आर्मी’चे चंद्रशेखर आझाद मुंबईत नजरकैदेत

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. चंद्रशेखर आझाद यांची  मुंबईत जाहीर सभा नियोजित आहे. मात्र या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. वरळीतील जांभोरी मैदानावर उद्या ही सभा नियोजित होती,  मात्र त्यापूर्वीच चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. मालाडमधील हॉटेल मनालीमध्ये आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. या हॉटेलला […]

'भीम आर्मी'चे चंद्रशेखर आझाद मुंबईत नजरकैदेत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. चंद्रशेखर आझाद यांची  मुंबईत जाहीर सभा नियोजित आहे. मात्र या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. वरळीतील जांभोरी मैदानावर उद्या ही सभा नियोजित होती,  मात्र त्यापूर्वीच चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. मालाडमधील हॉटेल मनालीमध्ये आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. या हॉटेलला पूर्णपणे पोलिसांचा वेढा आहे. पोलिसांच्या कारवाईने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. दरम्यान आजच्याऐवजी उद्या सभा घेण्याची तयारी आझाद यांची आहे.

चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदाच मुंबई आणि महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मात्र वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं विजय दिवस साजरा केला जाणार आहे. भीमा कोरेगाव संघर्ष महासभेत चंद्रशेखर आझाद हे भाषण देणार आहेत. मात्र गेल्या वर्षी झालेला हिंसाचार लक्षात घेता, पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली आहे. त्यामुळे तणावाची स्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवलं आहे.

कोण आहेत चंद्रशेखर आझाद? – चंद्रशेखर आझाद हे नाव उत्तर प्रदेशातील जातीय हिंसाचारानंतर सर्वांसमोर आलं. – या दंगलीनंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली. – देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे – सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून काही दिवसांपूर्वीच सुटका झाली. – देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख बनली.

भीम आर्मी चंद्रशेखर आझाद यांनी तीन वर्षापूर्वी भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली आहे. बहुजन समाजासाठी भीम आर्मी संघटनेची स्थापना केल्याचं आझाद यांचं म्हणणं आहे.दलित, बहुजन समाजाच्या सुरक्षेसाठी आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही संघटना काम करत असल्याचं आझाद यांनी सांगितलं.

चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्र दौरा

29 डिसेंबर : मुंबईतील दादर चैत्यभूमी इथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार, संध्याकाळी 4 वाजता वरळीतील जांबोरी मैदान येथील महाराष्ट्र भीम आर्मी आयोजित पहिल्या आंबेडकरी जनचेतना सभेला मार्गदर्शन 30 डिसेंबर : पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन 31 डिसेंबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद आंबेडकरी तरुणाईशी या कार्यक्रमाचे आयोजन 1 जानेवारी 2019 – भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभास अभिवादन करुन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विजय स्तंभावर पुष्पवृष्टीचं नियोजन 2 जानेवारी 2019 – लातूरमध्ये जाहीर सभा 4 जानेवारी 2019 – अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जाहीर सभा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.