“गोपीचंद पडळकरांना जोडे मारा ५० हजार मिळवा”

वंचित बहुजन आघाडीतील (VBA) बंडखोर धनगर नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar Join BJP) सोमवारी (30 सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

गोपीचंद पडळकरांना जोडे मारा ५० हजार मिळवा
Follow us
| Updated on: Sep 29, 2019 | 9:01 PM

मुंबई: वंचित बहुजन आघाडीतील (VBA) बंडखोर धनगर नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar Join BJP) सोमवारी (30 सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे पडळकरांनी वंचित बहुजन आघाडी सोडल्याने भिमसेना (Bhimsena on Gopichand Padalkar) चांगलीच संतापल्याचं दिसत आहे. भिमसेनेनं गोपीचंद पडळकरांना जोडे जोडाने मारणाऱ्यांना 50 हजार रुपयांच्या बक्षिसाची (Prize For Beating) घोषणा केली आहे.

भिमसेनेने गोपीचंद पडळकरांवर वंचित बहुजन आघाडीचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. यावर गोपीचंद पडळकरांनीही आपली भूमिका मांडली आहे. पडळकर म्हणाले, “मी कुणाचाही विश्वासघात केलेला नाही. लोकशाहीमध्ये कुणी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे कुणाला गैरसमज होऊ नये. मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.”

“पक्षाने सांगितल्यास अजित पवारांविरोधातही लढेन”

भारतीय जनता पक्ष मला जिथून उभं करेल तेथून मी लढायला तयार आहे. पक्षाने अजित पवारांच्या विरोधात उभं राहण्यास सांगितलं, तर तेथेही निश्चित उभं राहिल, असंही मत गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केलं.

पडळकर कुठल्या मतदारसंघातून मैदानात?

सांगलीतील जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पडळकर लोकसभा निवडणुकीतही सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी खानापूर आणि जत मतदारसंघात पडळकर यांना जास्त मतदान झालं होतं.

वाचा- धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हिरोच्या भूमिकेत, ‘धुमस’चा ट्रेलर रिलीज 

भाजपाचा गड असणाऱ्या जतमध्ये सध्या विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे. शिवाय येथील धनगर समाजाची संख्या अधिक असल्यामुळे पडळकर यांच्या नावाचा पर्याय पुढे आला आहे. तर खानापूरमध्ये पडळकर यांची मतं निर्णायक ठरणार आहेत. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर आमदार आहेत.

पडळकर युती किंवा आघाडीपैकी ज्या गटात जातील त्यांचं पारडं जड होणार आहे. त्यामुळे पडळकर यांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युती झाली नाही, तरी भाजप आपला उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर यांना खानापूरमधून उभे करु शकते.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र काही गोष्टींवरुन बिनसल्याने पडळकरांनी पक्षाला रामराम करत राजीनामा दिला आहे.

लोकसभेवेळी सांगलीत भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत झाली होती. सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील रिंगणात होते. संजयकाका पाटील पाच लाख आठ हजार मतं मिळवत विजयी झाले होते. स्वाभिमानीचे विशाल पाटील 3 लाख 44 हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. तर पडळकरांनाही तीन लाख मतं मिळाली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.