Bhiwandi Lok sabha result 2019 : भिवंडी लोकसभा मतदारसंघ निकाल
भिवंडी लोकसभा : भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी बाजी मारली. महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले होते. इथे 53 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार कपिल पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार सुरेश टावरे या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती. या निवडणुकीत एकूण 18 लाख […]
भिवंडी लोकसभा : भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी बाजी मारली. महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले होते. इथे 53 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार कपिल पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार सुरेश टावरे या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती. या निवडणुकीत एकूण 18 लाख 89 हजार 443 पैकी 10लाख 02 हजार 888 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2014 मधील निवडणुकीपेक्षा यावेळी अवघे दीड टक्के मतदान वाढले होते.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | कपिल पाटील (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | सुरेश टावरे (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | डॉ. ए. डी. सावंत (VBA) | पराभूत |
तुल्यबळ लढत
भिवंडी लोकसभेत भाजपाचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे या दोन तुल्यबळ आजी-माजी खासदारांमध्ये ही लढत होत आहे. कपिल पाटील यांचे राजकारण हे सुरुवातीपासून सुरेश टावरे यांच्यापेक्षा वरचढ ठरत होते. परंतु सुरेश टावरे यांचा सरळ स्वभाव हा कपिल पाटील यांच्यापेक्षा सरस ठरत असल्याने, सहानभुती ही दगडापेक्षा वीट मऊ अशी होती.
सर्वच विधानसभा मतदारसंघात थोड्या फार प्रमाणात मतदान वाढले असले तरी त्यामागील कारणांचा विचार करता, ते कोणाच्या पारड्यात पडेल याबाबत मतदानापासूनच साशंकता वर्तविली जात आहे. भाजपसोबत शिवसेना, श्रमजीवी, कुणबी सेना, आरपीआय आठवले गट यांची वज्र मूठ बनली होती. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात दोन जाहीर सभा घेऊन वातावरण भाजपामय केलं. उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी भाजपा प्रवक्ते शाहनवाझ हुसेन,भाजपा खासदार तथा भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी, केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिंह तर शिवसेनेचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडखोरी थोपवून शिसैनिकांना प्रचारात राबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
त्यासोबत ऐनवेळी कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी जाहीर केलेला पाठिंबा आणि जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेची आदिवासी समाजावर असलेली पकड या कपिल पाटील यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. मात्र शिवसेना बंडखोर सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी सुरुवातीपासून कपिल पाटील यांना उघड विरोध केला. त्यासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नसतानाही कपिल पाटील यांना विरोधासाठी त्यांनी उघड नव्हे परंतु पडद्यामागून बरीच सूत्रं हलवली. म्हात्रे यांनी भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड याठिकाणी प्रचार केल्याने त्याचा फटका कपिल पाटील यांना बसेल असा अंदाज काहींनी वर्तवला.
दुसरीकडे काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्याकडे कार्यकर्त्यांचे पाठबळ जास्त नसल्याने, ते सुरुवातीपासून स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह प्रचारात उतरले होते. त्यांच्यासाठी नाना पटोले, माणिकराव ठाकरे या राज्यस्तरावरील दोन नेत्यांव्यतिरिक्त कोणीही भिवंडी लोकसभेत न फिरकल्याने, येथील किल्ला सुरेश टावरे यांना एकांगी लढवावा लागला. त्यात राष्ट्रवादीची ग्रामीण भागात साथ मिळत असताना, भिवंडी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष खालिद गुड्डूने अंग काढून घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे कार्यकर्ते सैरभर झालेले होते. त्यामुळे शहरात फक्त मुस्लिम मतांच्या बळावर यापूर्वी मिळविलेली आघाडी किती वाढते हे पाहणे महत्वाचे असेल असं तज्ज्ञ म्हणतात. भिवंडी शहरातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नाराजी दूर झाल्याने, त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याने ते टावरे यांच्यासाठी सकारात्मक होतं.
भिवंडी लोकसभा मतदारसंघा – विधानसभानिहाय आकडेवारी
भिवंडी लोकसभा 2019 2014
भिवंडी ग्रामीण 65.62% 65.94%
शहापुर 59.85% 61.87%
भिवंडी पश्चिम 50.81% 48.65%
भिवंडी पूर्व 46.93% 44.00%
कल्याण पश्चिम 43.07% 42.51%
मुरबाड 56.64% 51.77%
एकूण 53.07% 51.58%