भुजबळ बधीर झालेत, कलंकित नेता; मनोज जरांगे पाटील यांचा पलटवार

भुजबळ बधीर झाले आहेत. फुकटचं खाल्ल्यावर असच होतं. सारथीमध्ये घुसला तरी आमचा त्याला विरोध नाही. सरकारनेच आमच्याकडून वेळ घेतला आहे, एवढं तरी डोकं असावं. हा फडणवीस यांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या मंत्र्याने बधीरा सारखं बोलू नये. ते बावचळल्यासारखं बोलेल तर सामान्य काय एकणार? आम्ही सामान्य ओबीसी किंवा इतर कोणत्या जातीबद्दल बोलत नाही. पण भुजबळांना सुट्टी नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

भुजबळ बधीर झालेत, कलंकित नेता; मनोज जरांगे पाटील यांचा पलटवार
manoj jarange patil and chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 6:29 PM

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 13 डिसेंबर 2023 : छगन भुजबळ कुणावरही आरोप करत आहेत. भुजबळ बधीर झाले आहेत. अनेक वर्षापासून ते मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत. समाजात तेढ निर्माण करणारा त्यांच्या एवढा नेता नाही. भुजबळ कलंकित नेते आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मला गोळी मारण्यात येणार आहे. पोलिसांचा तसा रिपोर्ट आहे, असं छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं होतं, त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

बीडमध्ये त्याच्याच पाहुण्यांनी घर जाळलं अन् विनाकारण मराठ्यांना बदनाम करत आहेत. ज्यांच घर जळाले ते साळुंखे, क्षीरसागर म्हणाले बीडमध्ये झालेल्या जळपोळीशी मराठा समाजाच संबंध नाही. त्यांच्याच पाहुण्यांनी घर जाळलं. त्यांना अटक का नाही? भुजबळ म्हणतो बीडमध्ये जाळपोळ झाली म्हणून तिथे गेलो. मग अंतरवालीमध्ये घरात कोंडून मारलं तेव्हा कुठे होता? तिथे महिलांचे डोके फुटले होते. तिथे यायला रोग आला होता का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

फडणवीस यांचं बळ

जाळपोळीत कोड नंबर असल्याचं पोलिसांनी माहीत नाही. मग भुजबळांना कसं माहिती झालं? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की यांचं काहीच ऐकू नका. हे दंगली भडकावणारे आहेत. यांचं ऐकून तुम्ही निष्पाप लोकांवर केसेस केल्या, यांचं एकूण अंतरवालीत लोकांना अटक केली. फडणवीस यांनी याला कमी बळ दिलं तर दंगली होणार नाहीत. फडणवीस यांना विनंती तुम्ही त्यांच्यावर असलेल्या महाराष्ट्र सदन केस काढून घेतल्या आहेत? ज्यांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्र खाल्ला त्यांना साथ द्यायची? हे लोकांना दिसत आहे. फडणवीस यांनी त्यांना समज देण्याऐवजी बळ देत आहेत, हा आरोप नाही. मात्र गैसमज पसरू नये यासाठी सांगत आहे, असा दावा त्यांनी केला.

भुजबळ कलंकित मंत्री

भुजबळ बोलल्याने महाराष्ट्रात तणाव वाढत आहे. त्यांना बळ देऊ नका. राज्य तुम्हाला चालवायचं आहे. तुम्ही माहिती घेऊन बघा. तुम्ही त्याचं ऐकतात ही शंका नाही, खरंय. तुम्ही त्याचं ऐकत असाल तर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागले. भुजबळ बोलणार, पण मराठे डोक्यात घेणार नाही. छोट्या छोट्या ओबीसी जाती त्यांच्या विरोधात आहेत. फडणवीस त्याच्या केस मागे घेत असल्याने बळ मिळतंय असं वाटतं. भुजबळ धनगर आरक्षण बाबत भूमिका स्पष्ट करत नाही. धनगर, ओबीसी आरक्षण धक्का लागत नाही. भुजबळांनी एकूण वातावरण खराब करू नये. हा स्वतंत्र मिळाल्या पासून कलंकित मंत्री आहे, अशी टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा.
'संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना तोंड...', कोणाचा घणाघात?
'संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना तोंड...', कोणाचा घणाघात?.