Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

तृप्ती देसाई नेमक्या कोणत्या नेत्यावर आरोप करणार, त्यामुळे राजकीय धुरळा उडणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. (Trupti Desai NCP Leader Raped)

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ
Trupti Desai
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 11:46 AM

मुंबई : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून तृप्ती देसाईंनी हा दावा केला. पीडितेसह पत्रकार परिषद घेत नेत्याचं बिंग फोडण्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे. (Bhumata Brigade Trupti Desai claims NCP Leader allegedly Raped lady)

“आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार… तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह पत्रकार परिषद” अशी फेसबुक पोस्ट लिहून तृप्ती देसाई यांनी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्या नेमक्या कोणत्या नेत्यावर आरोप करणार, त्यामुळे राजकीय धुरळा उडणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार.. थोड्याच वेळात तृप्ती देसाईंची पीडीतेसह 12 वाजता पत्रकार परिषद

Posted by Trupti Desai on Wednesday, 31 March 2021

राष्ट्रवादीचा तिसरा नेता अडचणीत?

यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. तर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली. (Bhumata Brigade Trupti Desai claims NCP Leader allegedly Raped lady)

महाविकास आघाडी सरकारवर आरोप

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघा मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं.

संबंधित बातम्या :

मी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेते, कारण… : रेणू शर्मा

संजय राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता?; भाजप आमदार म्हणतात, शिवसेना भवनात फ्रेम करुन ठेवला!

मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप, औरंगाबाद पोलिसांकडून सलग 6 तास चौकशी

(Bhumata Brigade Trupti Desai claims NCP Leader allegedly Raped lady)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.