Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनाबाबत मोठी बातमी, विशेष न्यायालयाचे ‘ईडी’ला काय आहेत निर्देश..!

पत्राचाळ हा म्हाडाचा भूखंड आहे. म्हाडा व भाडेकरुंची दिशाभूल करुन प्रवीण राऊत यांनी यामधील अनेक भाग हा खासगी कंत्राटदारांना देऊ केले व 25 टक्के शेअर्स हे एचडीआयएलला विकले. शिवाय या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यामध्ये जमा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनाबाबत मोठी बातमी, विशेष न्यायालयाचे 'ईडी'ला काय आहेत निर्देश..!
खा. संजय राऊत
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 3:46 PM

मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Sanjay Raut) शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यांनी (Application for bail) जामिनासाठी अर्ज केला होता पण त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. एकीकडे त्यांच्यावर असलेल्या आरोपावरुन चौकशी सुरु असताना दुसरीकडे त्यांनी दाखल केलेल्या जामिन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत (ED Office) ईडीने उत्तर द्यावे असे निर्देशच विशेष पीएमएलए न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली गेली असली तरी, 16 सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयाकडून काय उत्तर दिले जाते? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोठडीत वाढ नंतर अर्ज

दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर लागलीच राऊत यांनी जामिनीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. गुरुवारी त्यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी झाली असून या संदर्भात ईडी कार्यालयाने 16 सप्टेंबरपर्यंत आपले उत्तर द्यावे असे निर्देश देण्यात आले आहे. आता ईडी कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या उत्तरावरच राऊतांचा मुक्काम 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार का त्यापूर्वी काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

राऊतांवर नेमका आरोप काय?

पत्राचाळ हा म्हाडाचा भूखंड आहे. म्हाडा व भाडेकरुंची दिशाभूल करुन प्रवीण राऊत यांनी यामधील अनेक भाग हा खासगी कंत्राटदारांना देऊ केले व 25 टक्के शेअर्स हे एचडीआयएलला विकले. शिवाय या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यामध्ये जमा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. पत्राचाळ विकसित करण्याचं काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या चाळीचा काही भाग खासगी विकासकाला विकला असल्याचा ईडीचा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्या गुरु कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्रा चाळीतील 3 हजार फ्लॅटचं काम देण्यात आलं होतं. त्यापैकी 672 फ्लॅट भाडेकरारासाठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, 2011 ते 2013 दरम्यान प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.