नवी दिल्ली, दिनेश दुखंडे : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. याबाबत निवडणुक आयोगाने खूप मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही.
शिवसेना हे पक्षाचं नावही दोन्ही गटांना सध्या धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडेपर्यंत दोन्ही गटांना हे निर्बंध लागू असणार आहेत.
शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची घोषणा केली आहे.