निकालाआधी दिल्लीत विरोधकांच्या हालचालींना प्रचंड वेग

लखनौ : निवडणूक निकाल जसा जवळ येतो आहे, तसा विरोधीपक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून निकालानंतर आघाडीसाठी भेटीगाठी आणि चर्चा होत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनीही जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. शुक्रवारी दिल्लीत पोहचलेल्या नायडू यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली. त्यानंतर शनिवारी अखिलेश […]

निकालाआधी दिल्लीत विरोधकांच्या हालचालींना प्रचंड वेग
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

लखनौ : निवडणूक निकाल जसा जवळ येतो आहे, तसा विरोधीपक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून निकालानंतर आघाडीसाठी भेटीगाठी आणि चर्चा होत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनीही जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. शुक्रवारी दिल्लीत पोहचलेल्या नायडू यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली. त्यानंतर शनिवारी अखिलेश यादव आणि मायावती यांचीही भेट घेतली.

शनिवारी चंद्रबाबू नायडूंनी सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यानंतर नायडूंनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींची भेट घेत चर्चा केली. उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप एकत्र येत निवडणूक लढत आहेत. त्यामुळे मायवती आणि अखिलेश देशाच्या राजकारणात मोठी भूमिका निभावू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर नायडू घेत असलेल्या या भेटींनाही तेवढेच जास्त राजकीय महत्व आहे. नायडूंनी मायावतींची भेट घेताना त्यांना आंब्याच्या पेटीची भेटही दिली.

भेटीच्या सत्रांनी विरोधीपक्षात राजकीय घडामोडींना वेग

निवडणूक निकालात जर तिसऱ्या आघाडीचे सरकार बनण्याची शक्यता तयार झाली तर पंतप्रधान पदासाठी होणाऱ्या दावेदारींमध्ये मायावतींचे नाव आघाडीवर असेल. त्यामुळे नायडूंनी मायावतींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि मायावतींची भेट घेण्यापूर्वी चंद्रबाबू नायडूंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचीही भेट घेतली होती.

विरोधीपक्षात एका नावावर सहमतीसाठी प्रयत्न

एकीकडे चंद्रबाबू नायडू अनेक पक्षांच्या प्रमुखांना भेटून लोकसभा निकालानंतरच्या आघाडीची शक्यता तपासत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अनेक बैठका घेतल्या आहेत.

सोनिया गांधींच्या नियोजित बैठकीत मोठा बदल

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुख सोनिया गांधींनी सर्व विरोधीपक्षांची आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) नेत्यांची बैठक निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजी बोलावली होती. मात्र, त्यापूर्वीच चंद्रबाबू नायडूंनी विरोधीपक्षातील नेत्यांच्या मेरॅथॉन भेटी घेतल्याने सोनिया गांधी सक्रीय झाल्या आहेत. आज त्यांची दिल्लीत चंद्रबाबू नायडूंशी भेट होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच नियोजित वेळेपूर्वीच त्या विरोधीपक्षांची बैठक बोलावण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सोनियांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना फोन करुन चर्चा केल्याचेही सांगितले जात आहे. तसेच तिसऱ्या आघाडीतील नेत्यांना 23 मे रोजी होणाऱ्या दिल्लीतील बैठकीसाठी पत्र पाठवून आमंत्रित केले आहे. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केल्याचीही माहिती मिळत आहे.

बिजू जनता दल (BJD), युवाजना श्रामिका रेतु काँग्रेस पक्ष (YSRC), तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), तेलगू देसम पक्ष (TDM) आणि NDA व्यतिरिक्तच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.