पाटना: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप भाजपनं केलाय. राहुल गांधी यांनी सकाळी मतदानाला सुरुवात होताना एक ट्वीट केलं. त्या ट्विटरवरुनच भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. (Complaint against Rahul Gandhi bye BJP for violating code of conduct)
Bharatiya Janata Party (BJP) files complaint to Election Commission (EC) against Congress leader Rahul Gandhi over his tweet posted today asking for votes in the first phase of #BiharElections from voters today. pic.twitter.com/5XUg8NHAFG
— ANI (@ANI) October 28, 2020
राहुल गांधी यांनी आज मतदारांना न्याय, रोजगार आणि शेतकरी-कामगारांसाठी महाआघाडीला मतदान करण्याची मागणी केली. ‘इस बार न्याय, रोजगार, किसार-मजदूर के लिए आपका वोट सिर्फ महागठबंधन के लिए. बिहार के पहले चरण के मतदान की आप सभी को शुभकामनाएँ’ असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं. ऐन मतदानादिवशी एखाद्या पक्षाला मतदान करा असं सांगून राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली आहे.
गया शहरमधील भाजप उमेदवार प्रेम कुमारही आज आपल्या एका वेगळ्याच कारनाम्यानं चर्चेत आले आहेत. प्रेम कुमार मतदान करण्यासाठी थेट सायकलवर गेले. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी कमळाचं चित्र असलेला मास्क तोंडाला लावला होता. मतदान केंद्रावर आल्यानंतरही त्यांनी आपल्या गळ्यातील कमळाचं चित्र असलेला गमजा आणि मास्क काढला नाही. मतदान केंद्रावर त्यांना याबाबत विचारलं असता आचारसंहिता भंगाचा कुठलाही विचार आपल्या मनात नव्हता असं उत्तर त्यांनी दिलं. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांकडून कुमार यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Returning Officer to file an FIR against Bihar Minister and BJP leader Prem Kumar for violation of the model code of conduct by wearing a mask with his party’s symbol at polling booth. https://t.co/Avxy37SJic
— ANI (@ANI) October 28, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानासाठी काही नियमावली जारी केली आहे. त्यानुसार एका मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1 हजार 600 वरुन 1 हजार करण्यात आली आहे. त्याचबरोबर 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या मतदारांसाठी पोस्टल मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर वोटिंग मशीन सॅनिटाईझ करणं, मतदान कर्मचाऱ्यांसाठी मास्क, थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर, साबन आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुढच्या वेळी मोदी-नितीश कुमार आले तर त्यांना पकौडे खायला घाला, राहुल गांधींचा निशाणा
Complaint against Rahul Gandhi bye BJP for violating code of conduct