Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result 2020 LIVE | बिहार निवडणुकांतील यश आणि विजय फडणवीसांमुळे, निकालापूर्वीच प्रसाद लाड यांच्याकडून श्रेय

देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केल्यामुळे हे त्यांचंही यश आणि विजय आहे, असं प्रसाद लाड म्हणाले

Bihar Election Result 2020 LIVE | बिहार निवडणुकांतील यश आणि विजय फडणवीसांमुळे, निकालापूर्वीच प्रसाद लाड यांच्याकडून श्रेय
bjp mla prasad lad
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:51 AM

Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सुरुवातीच्या कलांनुसार एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच यश आणि विजयाचे श्रेय भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं. (Bihar Election Result 2020 Prasad Lad gives credit to Devendra Fadnavis for BJP victory LIVE Updates)

बिहारमधील निवडणुकांच्या निकालाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन प्रसाद लाड यांनी केलं. “एक्झिट पोलमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस यांचंही यश आणि विजय आहे. काही तासातच एनडीए 130 च्या वर जाईल आणि महागठबंधन 100 च्या खाली येईल” असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती. अधिकृतरित्या नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल” असा दावा फडणवीस यांनी केला होता.

छगन भुजबळ काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा वैयक्तिक रोष भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आहे, असंही लाड म्हणाले. “भाजपची लाट राहिलेली नाही, नरेंद्र मोदींचा करिष्मा राहिलेला नाही, बिहारमध्ये विरोधीपक्षाचं सरकार येईल, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली होती. (Bihar Election Result 2020 Prasad Lad gives credit to Devendra Fadnavis for BJP victory LIVE Updates)

“तेजस्वी यादवांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भाजपसारखा मोठा पक्ष, नितीशकुमार यांच्यासारखे मुख्यमंत्री समोर होते, तर वडील लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत, याही परिस्थितीत एकट्याच्या हिमतीवर पक्षाचं नेतृत्व करणं कौतुकास्पद आहे” असंही भुजबळ म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

तेजस्वी यादवांमुळे नव्हे, कोरोनामुळे आमचा पराभव; जेडीयूचं अजब तर्कट

बिहार निवडणुकीच्या निकालांवरुन प्रवीण दरेकर-अमोल मिटकरी आमने-सामने

(Bihar Election Result 2020 Prasad Lad gives credit to Devendra Fadnavis for BJP victory LIVE Updates)

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.