Gupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, राजकीय पक्ष ठरला!
बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे (Bihar Gupteshwar Pandey joining Janta Dal party) हे अपेक्षेप्रमाणे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
पाटणा : बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे (Bihar Gupteshwar Pandey joining Janta Dal party) हे अपेक्षेप्रमाणे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. गुप्तेश्वर पांडे हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दलात (Janta Dal) प्रवेश करत आहेत. दुपारी एक वाजता हा प्रवेश होणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी गुप्तेश्वर पांडे आग्रही होते. याशिवाय गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करुन, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. (Bihar Gupteshwar Pandey joining Janta Dal party)
ही सर्व पार्श्वभूमी पाहता गुप्तेश्वर पांडे हे राजकीय पक्षात प्रवेश करणार असा दावा, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी केला होता. हा दावा आता खरा ठरला आहे.
बिहार विधानसभेच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती
बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस (व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस) घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली होती.गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.
गुप्तेश्वर पांडे बिहार विधानसभेच्या रिंगणात?
दरम्यान, नुकतंच बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे. या निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे जनता दलाकडून रिंगणात उतरु शकतात.
कोण आहेत गुप्तेश्वर पांडे?
गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गेरुबंध गावात झाला. पांडे यांनी पाटणा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदवी संपादन केली. विशेष म्हणजे संस्कृतमधून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. दुसर्या प्रयत्नात आयपीएस परीक्षा पास होऊन त्यांनी पोलिस सेवेत प्रवेश केला.
गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतली होती. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते.
संबंधित बातम्या
नितीशकुमारांवर बोलण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही, बिहार पोलीस महासंचालकांची आगपाखड
Bihar Election | बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान; 10 नोव्हेंबरला निकाल
Gupteshwar Pandey | बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?
VIDEO | ‘बिहार के रॉबिनहूड’…, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारताच गुप्तेश्वर पांडेंवर रापचिक सॉन्ग
गुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल