बिहारच्या राजकारणात खळबळ, लालूंना एकाच दिवशी तीन धक्के, आधी पाच आमदारांचा राजीनामा, मग…
राजदच्या आठपैकी पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने विरोधीपक्ष नेत्या आणि लालू यांच्या अर्धांगिनी राबडी देवी यांची खुर्ची धोक्यात आली आहे (Bihar Politics In a setback to Lalu Prasad Yadav Five MLC Resigns from RJD)
पाटणा : बिहारच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडाली असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना एकाच दिवशी तीन धक्के बसले आहेत. विधान परिषदेवरील राजदच्या आठपैकी पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे विरोधीपक्ष नेत्या राबडी देवी यांची खुर्ची धोक्यात आली आहे, तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (Bihar Politics In a setback to Lalu Prasad Yadav Five MLC Resigns from RJD)
पहिला धक्का
ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादव यांना हादरा बसला आहे. गुजरातनंतर बिहारमध्येही विधान परिषद निवडणुकीच्या आधी पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. बिहारमधील विरोधीपक्ष राजदच्या पाच आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी जनता दल युनायटेड (जदयु) मध्ये प्रवेश केला.
रणविजय सिंह, दिलीप रॉय, संजय प्रसाद, राधा चरण सेठ आणि कमरे आलम या पाच आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला अलविदा केले. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी लालू यांना चांगलाच दणका दिल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस
लालू प्रसाद यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रतापही विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सभागृहात न पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
दुसरा धक्का
राजदच्या आठपैकी पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने विरोधीपक्ष नेत्या आणि लालू यांच्या अर्धांगिनी राबडी देवी यांची खुर्ची धोक्यात आली आहे. बिहार विधानपरिषदेत एकूण 75 जागा आहेत आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 8 जागा आवश्यक आहेत. मंगळवारी पक्षाच्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने राजदकडे केवळ तीन जागा शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत राबडी देवी यांना लवकरच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.
बिहार विधानपरिषदेत सध्या 29 जागा रिक्त आहेत. यात 12 राज्यपाल निर्देशित, 9 विधानसभा, चार शिक्षक मतदार संघ आणि चार पदवीधर मतदारसंघ आहेत. सध्या जेडीयूचे 20, भाजपचे 16, राजदचे तीन, लोजप आणि हमचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे दोन आणि अपक्ष असे दोन विधानपरिषदेचे सदस्य आहेत. (Bihar Politics In a setback to Lalu Prasad Yadav Five MLC Resigns from RJD)
बिहार विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 6 जुलै रोजी मतदान होणार आहे. मात्र पक्षात उभी फूट पडल्याने राजदसाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
तिसरा धक्का
पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा राजदला तिसरा धक्का बसला. रामासिंह यांना राजदमध्ये प्रवेश दिल्याबद्दल रघुवंश प्रसाद सिंह यांच्या मनात राग असल्याचे बोलले जाते. सध्या रघुवंश प्रसाद पाटणा एम्समध्ये दाखल आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एके काळी रामासिंह हे लालू यादव आणि रघुवंश प्रसाद सिंह यांचे कट्टर विरोधक होते.
Massive setback for RJD in Bihar as five of its eight MLCs join JD(U): JD(U) officials
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2020
(Bihar Politics In a setback to Lalu Prasad Yadav Five MLC Resigns from RJD)