मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी काका-पुतण्याचं राजकारण आपण पाहत आलो आहोत. मात्र, या काका-पुतण्याच्या राजकारणात कायम वाद पाहायला मिळाला. पण बीड जिल्ह्यात दोन सख्ख्या बहिणींचं राजकारण राजकीय नेतेमंडळींच्या भावी पिढ्यांसाठी आदर्शवत आहे. भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे या राजकीय क्षेत्रात मोठं नाव असलेल्या बहिणी सध्या चर्चेत आल्या आहेत. त्याला कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी आपल्या लाडक्या बहिणीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.(Birthday wishes to Pritam Munde from Pankaja Munde)
खासदार प्रीतम मुंडे यांचा बुधवारी 38वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी मोठी बहिण म्हणून पंकजा मुंडे यांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या लहाणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘लहान माझी बाहुली, तीची मोठी सावली. इतकी एकरुप की जणू सावली. वाढदिवसाचे खूप आशीर्वाद. प्रीतम तू नेमही सुखी राहा’ अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लहान माझी बाहुली तिची मोठी सावली…इतकी एकरूप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशिर्वाद प्रीतम तू नेहमी सुखी रहा..@DrPritamMunde pic.twitter.com/RRpQiJnAiH
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 17, 2021
त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी राज्यातील भाजपचा चेहरा राहिलेले माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच फोटो ट्वीट केले आहेत. त्यात आपल्या लहानपणीच्या आठवणी असलेल्या फोटोंचा एक मोंटाज त्यांनी व्हिडीओ म्हणून टाकला आहे. या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे यांनी इंग्रजीत बोलताना प्रीतम मुंडे लहानपणी कशा होत्या? आपण तिच्या इच्छा कशाप्रकारे पूर्ण करत असू? प्रीतम मोठी झाल्यावर तिच्याकडून आपण काही गोष्टी शिकल्याचं पंकजा यांनी सांगितलं. शेवटी पंकजा यांनी आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
My little sister…@DrPritamMunde pic.twitter.com/wN3d3KDL8w
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 17, 2021
प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा लोकसभेत
डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवून खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली. अखेर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर 1 लाख 78 हजार 920 मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. राजकीय क्षेत्रासोबत प्रीतम मुंडे सामाजिक कामातही अग्रेसर असतात. गोपीनाथ मुंडे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर प्रीतम मुंडे त्यांच्या जागेवर निवडून आल्या होत्या.
संबंधित बातम्या :
जेव्हा डॉ. प्रीतम मुंडे गाडी थांबवून जखमी व्यक्तीची मदत करतात….
Birthday wishes to Pritam Munde from Pankaja Munde