Operation Lotus: दिल्लीत ऑपरेशन लोटस्, केजरीवाल यांच्या बैठकीला आम आदमी पार्टीचे आमदार गैरहजर, संपर्कातही नाहीत

आम आदमी पार्टीच्या आमदारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार आरोप केले आहेत. आपचे नेते संजय सिंह यांच्याकडून दिल्लीत ऑपरेशन लोटसचा आरोप करण्यात आला आहे. आपच्या आमदरांना भाजपाकडून ऑफर येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Operation Lotus: दिल्लीत ऑपरेशन लोटस्, केजरीवाल यांच्या बैठकीला आम आदमी पार्टीचे आमदार गैरहजर, संपर्कातही नाहीत
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 4:06 PM

नवी दिल्लीः दिल्लीत ऑपरेशन लोटसबाबत (Delhi Operation Lotus) प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थआनी सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला 8 आमदार अजून पोहचलेले नाहीत. पक्षश्रेष्ठींचा या 8 आमदारांबरोबर (AAP 8 MLA) संपर्कही होत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आपचे आमदार दिलीप पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासून काही आमदार संपर्कात आले नाहीत. या सगळ्यांशी बोलण्याचा आणि संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येतो आहे. त्यानंतर आपच्या वरिष्ठ नेत्यांनी सगळे आमदार लवकरच बैठकस्थानी पोहचतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.भाजपाकडून आपचे 40 आमदार (40 MLA) फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

आपची 4 आमदारांसह घेतली पत्रकार परिषद

आम आदमी पार्टीच्या आमदारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार आरोप केले आहेत. आपचे नेते संजय सिंह यांच्याकडून दिल्लीत ऑपरेशन लोटसचा आरोप करण्यात आला आहे. आपच्या आमदरांना भाजपाकडून ऑफर येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एका आमदाराला 20 कोटींची ऑफर

आम आदमी पार्टी सोडल्यास 20 कोटी आणि दुसऱ्या आणखी एका आमदाराला फोडल्यास 25 कोटी रुपये देण्यात येतील, असे या ऑफरचे स्वरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय सिंह यांनी सांगितले की,आपचे आमदार संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि आणखी एका आमदाराला आप पक्ष सोडण्यासाठी 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती देण्यात आली.

प्रस्ताव स्वीकारला नाही तर खोटे गुन्हे दाखल केले जातील

राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासोबत बुधवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आपकडून आपण भाजपची ऑफर नाकारल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी भाजपचा हा प्रस्ताव फेटाळला तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातील अशी धमकी देण्यात आल्याचेही आपच्या नेत्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.