NRC आणि NPR चा परस्पर काहीही संबंध नाही : अमित शाह
NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन आणि NPR म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर या दोघांचाही एकमेकांशी काहीही संबंध नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट केलं.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय मंत्रीमंडाळाने भारताच्या जणगणना 2021 च्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीलाही मंजुरी (NPR) दिली आहे. मात्र, यावरुन देशात काही लोक नागरिकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन आणि NPR म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर या दोघांचाही एकमेकांशी काहीही संबंध नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं.
“पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे NRC वर मंत्रिमंडळात आणि संसदेत कुठलीही चर्चा झालेली नाही. पक्षाच्या जाहिरनाम्याबाबत बोलायचं झालं, तर संसदेत चर्चा होणे आणि पक्षाच्या जाहिरनाम्यात एखादी गोष्ट असणे, या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत”. नागरिकत्व सुधारणा कायदा, NPR आणि NRC च्या मुद्यावरुन विरोधीपक्ष राजकारण करत असल्याची आरोप अमित शाहांनी केला. विरोधक यावरुनव अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. “कुठल्याही अल्पसंख्याकाला NPR पासून घाबरण्याची काहीही गरज नाही”, असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
LIVE : अमित शाह लाईव्ह https://t.co/WatjHVAsR0
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2019
भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही NRC आणि CAA चा विरोध होत आहे. यावर “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत असं कुठलंही काम करायला नको, ज्यामुळे कुठली समस्या उद्भवेल”, असं अमित शाह म्हणाले. तसचे, NPR बाबत कुणालाही काहीही समस्या नाही. याबाबत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन, असंही ते म्हणाले.
NPR ची प्रक्रिया काँग्रेसने सुरु केली, भाजपच्या जाहिरनाम्यात त्याबाबत काहीही नाही : अमित शाह
काँग्रेसने 2010 मध्ये NPR ची प्रक्रिया सुरु केली होती. NPR मध्ये आधार क्रमांक देण्यात काहीही चुकीचे नाही. NPR आमच्या जाहिरनाम्यात नाही.
NPR मध्ये जर कुणाची नोंद झाली नाही तर त्याचं नागरिकत्व रद्द होणार का? या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, “मी हे स्पष्ट करु इच्छितो की NPR मध्ये कुणाच्या नावाची नोंद झाली नाही म्हणून त्याचं नागरिकत्व रद्द होणार नाही. हे NRC पेक्षा वेगळं आहे”.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनावर अमित शाह म्हणाले, “हे विरोध प्रदर्शन राजकीय आहे. कारण, याबाबत त्या राज्यांमध्ये विरोध प्रदर्शन झालेलं नाही जिथे सर्वात जास्त घुसखोर आहेत”.
डिटेंशनवर अमित शाह काय म्हणाले?
जर कोणी दुसऱ्या देशातील व्यक्ती आपल्या देशात बेकायदेशीर येत असेल तर त्याला तुरुंगात ठेवलं जात नाही. तर त्याला डिटेंशन सेंटरमध्ये ठेवलं जातं. डिटेंशन सेंटरचा NRC सोबत काहीही संबंध नाही.
आसाममध्ये फक्त एक डिटेंशन सेंटर आहे. याबाबत मलाही शाश्वती नाही. पण जेही डिटेंशन सेंटर आहेत ते मोदी सरकारच्या काळात उभरण्यात आलेले नाही, इतकं मी नक्की स्पष्ट करु इच्छितो. इतकंच नाही तर जे डिटेंशन सेंटर तयार करण्यात आले आहेत ते सध्या कार्यरतही नाही, असंही शाह यांनी सांगितलं.
Amit Shah interview on CAA