ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?

2021 West Bengal Legislative Assembly election : पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका  होत आहेत.

ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं 'मिशन बंगाल' नेमकं काय?
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 1:44 PM

(Amit Shah mission Bengal) कोलकाता : भारतीय जनता पक्षाने पूर्वोत्तर भारतात कमळ फुलवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यावर विजयी पताका फडकवण्यासाठी भाजपने खास रणनीती आखली आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर, खुद्द ‘चाणक्य’ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah mission Bengal) हे कोलकात्यात दाखल झाले. शुक्रवारी रातोरात कोलकात्यात पोहोचलेल्या अमित शाहांनी पश्चिम बंगालसाठी विशेष प्लॅन तयार केला आहे. कोलकात्यातील ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस (Mamata Banerjee Trinamool Congress) सरकार उलथवून टाकण्यासाठी, भाजपने सर्वशक्ती पणाला लावली आहे. (BJP and Amit Shah mission Bengal for 2021 West Bengal Legislative Assembly election)

पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका  होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला आहे. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भाजपने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे निवडणुका होत आहेत.

अमित शाहांचं मिशन बंगाल

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात अमित शाह जनतेशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी, यावेळी तृणमूलचे अनेक आमदार आणि काही खासदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शुभेंदु अधिकारी या मोठ्या नावाचाही समावेश आहे.

फोडाफोडीला सुरुवात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अजून ५-६ महिने बाकी असले, तरी आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. ममतांच्या कॅबिनेटमधील मोठा चेहरा असलेले शुभेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. इतकंच नाही तर त्यांचे छोटे भाऊ सुमेंदु अधिकारी हे सुद्धा कमळ हाती घेणार आहेत.

दहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

बंगालमधील फोडाफोडीला ममतांच्या कॅबिनेटपासून सुरुवात झाली असली तर भाजपने पेटवलेली ही वात दूरपर्यंत जाणार असं दिसतंय. कारण डझनभार आजी-माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये दक्षिण कोंटाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनसारी मैती यांचाही समावेश आहे.

सीपीएमलाही झटका

भाजप केवळ ममतांच्या तृणमूललाचा झटका देत आहे असं नाही. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीही (M) भाजपच्या रडारवर असल्याचं दिसतंय. CPM आमदार तापसी मंडल आणि आमदार अशोक डिंडा हे भाजपमध्ये दाखल होत आहेत. CPM चे काही नगरसेवक, पंचायत आणि ग्राम पंचायत सदस्य भाजपमध्ये डेरेदाखल होणार आहेत.

अमित शाहांच्या दौऱ्याला महत्व का?

अमित शाह हे शनिवार आणि रविवार असा दोन दिवस पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मिदनापूर (Amit Shah Medinipore rally) इथे विशाल सभा घेणार आहेत. अमित शाहांनी शनिवारी स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करुन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. ममता बॅनर्जी या भारतीय संस्कृती आणि बंगालच्या संस्कृतीवर आघात करत असल्याचा आरोप अमित शाहांनी केला. यानंतर अमित शाह मेदिनीपूर इथल्या सभास्थळी दाखल होतील. त्याआधी ते सिद्धेश्वरी मंदिरात पूजा करणार आहेत. मग शहीद खुदीराम यांच्या घरी भेट देतील.

अमित शाहांच्या या आखीव रेखीव दौऱ्यावरुन भाजपने बंगाल जिंकण्यासाठी काय काय रणनीती आखली असू शकते याचा अंदाज येऊ शकतो.

अमित शहा हे न्यू टाऊन हॉटेलमध्ये उतरले आहेत. या ठिकाणाहून ते ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात प्रचार अभियानाला सुरुवात करणार आहेत. कोलकातापासून ते मेदिनीपूरसह संपूर्ण राज्यात शहा यांच्या दौऱ्यामुळे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज ते संपूर्ण मेदिनीपूर आणि उद्या बीरभूम पिंजून काढणार आहे. त्यानिमित्त्याने प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निवडणुकीपर्यंत दर महिन्याला अमित शाह बंगालमध्ये

बंगालमध्ये भाजपने ममतांचं सरकार उलथवून टाकण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी 200 जागा जिंकण्याचं टार्गेट घेऊन भाजप मैदानात उतरली आहे. अमित शाहांनी ही निवडणूक स्वत: आपल्या हाती घेतली आहे. त्यासाठी ते आता निवडणुकीपर्यंत दर महिन्याला बंगालचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. याआधी ते 5 नोव्हेंबरला बंगालमध्ये होते. त्यानंतर 19 आणि 20 डिसेंबरला बंगालमध्ये आहेत.

अमित शाहांचा रोड शो

अमित शाह हे उद्या बोलपूरमध्ये जाणार आहेत. यादरम्यान ते विश्व भारती विश्वविद्यालयाचा दौरा करुन लोकगायकांच्या घरी जेवण करतील. त्यानंतर भव्य रोड शोचं नियोजन करण्यात आलं आहे.

भाजपची लोकसभेतील कामगिरी

भाजपने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. अमित शाहांनी 2018 मध्ये बंगालमध्ये लोकसभेच्या 22 जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यावेळी भाजपने 18 जागा जिंकल्या. तर 4-5 जागा कमी फरकारने गमावल्या. त्यामुळे भाजपने आता विधानसभेच्या 200 जागा जिंकण्याचा जो चंग बांधला आहे, त्यापर्यंत भाजप कशी पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. त्यापैकी तृणमूलने सर्वाधिक 22 तर भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या.

पश्चिम बंगालमध्ये मराठी नेत्यांवर जबाबदारी

भाजपने पश्चिम बंगालमध्ये पाच झोन तयार केले असून प्रत्येक झोनची जबाबदारी एका नेत्यावर सोपविली आहे. त्रिपुरात डाव्या पक्षांची सत्ता उलथवून कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदानपूर या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांच्याकडे नवद्वीप, विनोद सोनकर यांच्याकडे राड बंग तर केंद्रीय नेते हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.

Vinod Tawade and Sunil Deodhar Bengal election 2021

विनोद तावडे आणि सुनील देवधर

बंगालमधील राजकीय गणित काय?

पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्यांची विधानसभा आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 219 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं होतं. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ 23, डाव्यांना 19 आणि भाजपला 16 जागाच मिळाल्या होत्या. आता भाजप आपल्या 16 जागांवरुन किती जागांवर विजय मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

    1. तृणमूल काँग्रेस -219
    2. काँग्रेस -23
    3. डावे – 19
    4. भाजप – 16
    5. एकूण – 294

पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास काय सांगतो?

स्वाभिमान आणि क्रांतीसाठीही बंगालची विशेष ओळख आहे. खुदीराम बोस ते नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या स्वातंत्र्यवीरांची ही भूमी आहे. पश्चिम बंगालचं राजकारण सर्वात हिंस्र राजकारण म्हणून ओळखलं जातं. राडा आणि रक्तपात हे ठरलेलं आहे. बंगालला राजकीय हिंसेची परंपरा आहे. त्याची सुरुवात व्हॉईसरॉय लॉर्ड कर्जन यांच्या 1905 मधील बंगाल विभाजनाच्या निर्णयापासून सुरु आहे ती आजतागायत आहे.

त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हिंसक घडामोडी बंगालमध्ये घडतच आहेत. बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्यांनी राज्य केलं. कम्युनिस्ट पक्षांच्या सत्ताकाळात रक्तपात व्हायचेच ते ममता बॅनर्जींच्या काळातही सुरुच असल्याचं चित्र आहे. मागील वर्षी अमित शाह हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते त्यावेळीही त्याची प्रचिती आली होती. अमित शाहांच्या रोड शोमध्ये तुफान राडा झाला होता. रोड शोमध्ये दगडफेक करुन जाळपोळही केली होती.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता भाजपचं मिशन बंगाल कसं वर्कआऊट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या 

ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?

(BJP and Amit Shah mission Bengal for 2021 West Bengal Legislative Assembly election)

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.