नागपुरात भाजप काँग्रेसचं OBC कार्ड, विधानपरिषदेला बावनकुळेंविरोधात ओबीसी उमेदवार?

विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत ओबीसी कार्ड खेळलंय.

नागपुरात भाजप काँग्रेसचं OBC कार्ड, विधानपरिषदेला बावनकुळेंविरोधात ओबीसी उमेदवार?
चंद्रशेखर बावनकुळे राजेंद्र मुळक
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 8:08 PM

नागपूर: विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत ओबीसी कार्ड खेळलंय. तर इकडे काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळं भाजपच्या ओबीसी कार्डला काँग्रेसनं ओबीसी उमेदवार देऊन उत्तर दिलंय. त्यामुळं या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना रंगणार आहे.

भाजप आणि काँग्रेसचं ओबीसी कार्ड

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर सध्या ओबीसी फॅक्टर अधिक चर्चेत आहे. गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत ओबीसींच्या जागेवर भाजप आणि काँग्रेसनं ओबीसी उमेदवार दिले. त्यामुळं आगामी 10 डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीतही ओबीसी फॅक्टर कायम आहे. भाजपनं माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत ओबीसी चेहरा दिलाय.

बावनकुळे यांनी राज्यभर दौरे करत ओबीसींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं कॉंग्रेस पुढं बावनकुळे यांचं मोठं आव्हान आहे. काँग्रेसही जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत असून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना उमेदवारी देत असल्याचं कळतंय. त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यास ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत रंगणार आहे.

भाजपचं नागपूर महापालिकेसाठी ओबीसी कार्ड?

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर भाजप ओबीसींच्या पाठीशी आहे, या सरकारच्या नाकर्तेपणा मुळं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं, मात्र ओबीसी म्हणून बावनकुळे यांना उमेदवारी दिल्याचं भाजपनं नाकारतंय. पण आगामी नागपूर महानगरपालिका निवडणूकीपूर्वी बावनकुळेंना तिकीट देऊन भाजपनं ओबीसी कार्ड खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

एकूणच या निवडणुकीत गेल्या पदवीधर निवडणुकीचा इतिहास, जिल्हा परिषद निवडणूक आणि आगामी नागपूर महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर ओबीसी मतं आवल्याकडे कसे वळतील या अनुषंगानं दोन्ही पक्षांनी ओबीसी उमेदवार दिले. यात कुणाला किती यश मिळतं यासाठी मात्र निकालाची वाट बघावी लागेल.

इतर बातम्या:

विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना कुणाचे आव्हान?, काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, तगडा उमेदवार देणार – ठाकरे

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर, कुणाला संधी मिळणार?

BJP and Congress gave ticket to OBC candidate for Nagpur MLC Election

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.