भाजपचा प्रचाराचा धुराळा, मोदींच्या 9, शाहांच्या 20 तर फडणवीसांच्या 65 सभा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) प्रचाराला स्फुरण चढणार आहे. यात भाजप सर्वात आघाडीवर दिसत आहे.

भाजपचा प्रचाराचा धुराळा, मोदींच्या 9, शाहांच्या 20 तर फडणवीसांच्या 65 सभा
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 6:55 PM

बीड: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) प्रचाराला स्फुरण चढणार आहे. यात भाजप सर्वात आघाडीवर दिसत आहे. भाजपने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी (BJP Election Campaign) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) 9, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) 20 आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 65 सभांचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांनी पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्याचं (Pankaja Munde Dasara Melava) निमंत्रण स्वीकारलं आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपने थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उतरवले आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. भाजपने आधीच आपल्या महाजनादेश यात्रेतून प्रचारात आघाडी घेतली आहे. आता मोदी, शाह आणि फडणवीसांच्या सभांनी भाजप महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा उडवणार असल्याचं दिसत आहे.

विशेष म्हणजे अमित शाह 20 सभा, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल 65 सभा घेणार आहेत. त्यामुळे भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या आनंदात भर पडली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी सभांचा तडाखा लावल्याने उमेदवारांना लोकांमध्ये पोहचणे सोपे होणार आहे. लोकसभेतील प्रचंड बहुमतातून मोदींची लोकप्रियता अद्यापही मजबूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे. याचा किती परिणाम होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

अमित शाह दसरा मेळाव्याला (8 ऑक्टोबर) भगवान भक्ती गडावर उपस्थित राहणार आहेत. भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा चौथा दसरा मेळावा आहे. यासाठी पंकजा मुंडेंनी खास अमित शाहांना आमंत्रित केले आहे. शाह यांच्या उपस्थितीमुळे पंकजा मुंडेंचं राजकीय वजन वाढल्याची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे ऐन निवडणुकीत होत असलेल्या या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी होत आहे. पंकजा मुंडे यानिमित्ताने आपले शक्तीप्रदर्शन करणार असल्याचंही बोललं जात आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.