‘बापाच्या नावाने थापा’, ठाकरेंच्या भाषणावर भाजप नेत्याचाही घणाघात!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना सोबत घेऊन हिंदुत्व व्यापक केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र शिल्लक सेनेच्या सरबरीत हिंदुत्वाचे गुपित इथं उघड झालं, असा टोला भातखळकरांनी लगावलाय.
मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर एकनाथ शिंदेंच्या गटातील नेत्यांनी चांगलंच तोंडसुख घेतलंय. खुद्द शिंदेंनीही (Eknath Shinde) या भाषणावर जोरदार टीका केली. आता भाजप नेत्यांनीही ठाकरेंच्या भाषणावर जहरी वक्तव्य केलंय. भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट केलंय. त्यात ते म्हणालेत, हा सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट आहे. बापाच्या नावाने थापा. अरे हाच खरा थापा आहे.. पण त्या आधी वाफा आहेत.
पहा अतुल भातळखळकरांचं ट्विट-
सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट…
बापाच्या नावाने थापा.
अरे हाच खरा थापा आहे…
पण त्या आधी वाफा आहे..
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 5, 2022
उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाविषयीच्या वक्तव्यावरही भातखळकरांनी खिल्ली उडवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना सोबत घेऊन हिंदुत्व व्यापक केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र शिल्लक सेनेच्या सरबरीत हिंदुत्वाचे गुपित इथं उघड झालं, असा टोला भातखळकरांनी लगावलाय.
तसेच उद्धव ठाकरे बोलत आहेत की राहुल गांधी, हेच कळत नसल्याचंही भातखळकर यांनी केलंय.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भाषणातून आव्हान दिलं. पाकव्याप्त काश्मीरमधील भारताची जागा घेऊन दाखवा असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरही भातखळकरांनी ठाकरेंवर टीका केली.
आठ वर्षात POK ची एकही फूट जमीन घेतली नाही… जनाब ठाकरे
उध्दव ठाकरे, अहो ते टक्केवारी घेण्या इतकं सोपं आहे का? ज्यांच्यामुळे देश खंडित झाला पाकिस्तानची निर्मिती झाली, POK अस्तित्वात आला. त्या काँग्रेसचे जोडे उचलताना त्यांनाही विचारा कधी तरी हा प्रश्न.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 5, 2022
शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे शिवसेनेची अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेला दसरा मेळावा दोन ठिकाणी झाला. बीकेसी ग्राउंडवर मुक्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा झाला.
तर शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.