BJP Candidate List | तावडे-खडसेंसह पाच दिग्गज होल्डवर, नऊ आमदारांचा पत्ता कट

भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

BJP Candidate List | तावडे-खडसेंसह पाच दिग्गज होल्डवर, नऊ आमदारांचा पत्ता कट
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 2:18 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी (BJP Candidate List MLA on hold) जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम, चंद्रकांत पाटील कोथरुड, अतुल भोसले- कराड दक्षिण, शिवेंद्रराजे भोसले जावळी यांना उमेदवारी मिळाली आहे. पहिल्या यादीत विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित या दिग्गजांचं नाव नाही.

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला आहे. भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

कोणते विद्यमान आमदार होल्डवर? (पहिल्या यादीत नाव नाही)

विनोद तावडे – बोरिवली

एकनाथ खडसे – मुक्ताईनगर

प्रकाश मेहता – घाटकोपर पूर्व

चंद्रशेखर बावनकुळे – कामटी

राज पुरोहित – कुलाबा

(BJP Candidate List MLA on hold)

जून महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, अंबरिशराजे आत्राम यांचा समावेश होता.

या आमदारांचा पत्ता कट (दुसऱ्या उमेदवारांना तिकीट)

सरदार तारा सिंह – मुलुंड

दिलीप कांबळे – पुणे कॅन्टॉन्मेंट

विजय काळे – शिवाजी नगर

मेधा कुलकर्णी – कोथरुड

आर टी देशमुख – माजलगाव

राजू तोडसम – आर्णी

विष्णू सावरा – विक्रमगड (मुलगा हेमंत सावरा यांना तिकीट)

उदेसिंग पाडवी – शहादा (मुलगा राजेश पाडवी यांना तिकीट)

गोविंद राठोड – मुखेड

भाजपच्या या मंत्र्यांना उमेदवारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम

चंद्रकांत पाटील – कोथरुड

आशिष शेलार – वांद्रे पश्चिम

जयकुमार रावल – सिंदखेडा

सुभाष देशमुख – सोलापूर दक्षिण

संभाजी पाटील-निलंगेकर – निलंगा

पंकजा मुंडे – परळी

राम शिंदे – कर्जत जामखेड

राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी

रविंद्र चव्हाण – डोंबिवली

सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर

राजकुमार बडोले – अर्जुनी मोरगाव

हेही वाचा : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा

जर फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला, तर भाजपला तिकीट वाटप (BJP Candidate List MLA on hold) करताना मोठी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी भाजपने केली आहे. अंतर्गत संस्थांनी सर्व्हे करुन या आमदारांची माहिती मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावरुन त्यांची तिकीटं धोक्यात आली आहेत.

हेही वाचा : शिवसेनेची संभाव्य उमेदवार यादी टीव्ही9 मराठीच्या हाती

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.