तेलही गेलं, तूपही गेलं; आधी महापालिका निवडणुकीत माघार, आता संदीप जोशींनी पदवीधर मतदारसंघही गमावला

महापालिका निवडणुका यापुढे न लढवण्याची जाहीर घोषणा केल्यामुळे महापौर संदीप जोशी यांची अडचण होणार आहे

तेलही गेलं, तूपही गेलं; आधी महापालिका निवडणुकीत माघार, आता संदीप जोशींनी पदवीधर मतदारसंघही गमावला
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 4:53 PM

नागपूर : गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाला (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने सुरुंग लावला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड असलेल्या नागपुरातच भाजपचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला खिजवून दाखवलं जात आहे. मात्र यामध्ये भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांची सर्वात मोठी अडचण झाली. (BJP Candidate Nagpur Mayor Sandeep Joshi left with no option after Nagpur Graduate Constituency Election defeat)

अनिल सोलेंच्या जागी महापौरांना उमेदवारी

महापौर संदीप जोशींनी यापुढे कोणतीही महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल सोले (Anil Sole) यांचं तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. परंतु जोशींना भाजपचा बालेकिल्ला राखता आला नाही. संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Vanjari) मोठ्या फरकाने विजयी झाले.

सप्टेंबर महिन्यात निवडणुकांची घोषणा होताच भाजपचं मिशन ‘पदवीधर मतदारसंघ निवडणूक’ सुरु झालं. रणनीती ठरवण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले होते. परंतु भाजपचं प्लॅनिंग फेल गेल्याचं चित्र आहे.

कोण आहेत संदीप जोशी?

  • संदीप जोशी नागपूर महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक
  • चार वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवकपदी
  • संदीप जोशी हे लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष
  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात
  • विधानसभा निवडणूक 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी
  • नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपकडून रिंगणात उतरले, मात्र काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांच्याकडून पराभव

महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा

“आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?” असा सवाल एका कार्यकर्त्याने संदीप जोशी यांना फेसबुक लाईव्हदरम्यान विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं 20 ऑगस्टला आपल्या वाढदिवशी स्पष्ट केलं होतं. (BJP Candidate Nagpur Mayor Sandeep Joshi left with no option after Nagpur Graduate Constituency Election defeat)

काय म्हणाले होते संदीप जोशी?

“अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतो की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही”, असं संदीप जोशी म्हणाले होते.

तेलही गेलं तूपही गेलं

आता संदीप जोशी यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं अशी झाली आहे. जाहीर घोषणा केल्यामुळे त्यांना आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणं जिकीरीचं जाईल. विधानपरिषदेची संधीही गेल्यामुळे नगरसेवकपदाचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पुनर्वसनासाठी थेट विधानसभा निवडणुकीचा पर्याय असू शकेल.

भाजपचा बालेकिल्ला खालसा

काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला.

निकालाच्या घोषणेची औपचारिकता

नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या पहिल्या पसंतीच्या मतमोजणीतच महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी यांनी मोठी आघाडी घेतली होती. परंतु विजयी मतांचा कोटा (60 हजार 747 मतं) पूर्ण करता न आल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. परंतु ही निकालाच्या घोषणेची केवळ औपचारिकता मानली जात होती.

“नागपूरच्या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा”

“नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्याने नागपूरच्या या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा झाली आहे” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजयानंतर दिली.

संबंधित बातम्या :

भाजपचा बालेकिल्ला 55 वर्षांनी खालसा, नागपूर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा, अभिजीत वंजारी विजयी

महापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत

चारवेळा नगरसेवक झालात, आता आम्हाला संधी द्या, कार्यकर्त्याची मागणी, महापौरांची निवडणूक न लढण्याची घोषणा

(BJP Candidate Nagpur Mayor Sandeep Joshi left with no option after Nagpur Graduate Constituency Election defeat)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.