ठाकरेंचा शपथविधी बेकायदेशीर, भाजप सुप्रीम कोर्टात जाणार
जर न्याय दिला नाही, तर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करु," असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला (chandrakant patil criticized on sworn taking ceremony) आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अवघा एक दिवस उलटला (chandrakant patil criticized on sworn taking ceremony) आहे. त्यानतंर आता त्यांच्यावर विरोधी पक्ष भाजपने जोरदार टीका केली (chandrakant patil criticized on sworn taking ceremony) आहे. “शपथ ही शपथ असते. ती त्या फॉर्मेटमध्ये घ्यावी लागते. जर ती त्या फॉर्मेटमध्ये घेतली नाही तर ती शपथ होत नाही.” अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी (chandrakant patil criticized on sworn taking ceremony) केली.
“जो शपथविधी झाला तोही बेकायदेशीर आहे. राज्यपालांना शपथ घेताना चार वेळेला टोकलं की तुमच्या श्रद्धा असू शकतात. बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले, अण्णाभाऊ साठेंबद्दल आम्हालाही श्रद्धा आहे. मात्र शपथ ही शपथ असते. ती त्या फॉर्मेटमध्ये घ्यावी लागते. जर ती त्या फॉर्मेटमध्ये घेतली नाही तर ती शपथ होत नाही. त्यामुळे जो शपथविधी झाला त्याबाबत एक याचिका राज्यपालांकडे दाखल केली आहे. यामुळे हा शपथविधी रद्द आणि बेकायदेशीर समजावा. नियमांच्या बाहेर समजावा असे राज्यपालांकडे दाखल केेलेल्या याचिकेत म्हटलं आहे. यावर राज्यपालांनी न्याय द्यावा. जर न्याय दिला नाही, तर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करु,” असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला (chandrakant patil criticized on sworn taking ceremony) आहे.
“नवीन सरकारने शपथ घेतल्यापासून विधानसभेचे, विधानमंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवायल सुरु केलं आहे. राज्यपालांना हंगामी अध्यक्ष निवडला असताना नियमांमध्ये तरतूद आहे की नवीन अध्यक्ष येईपर्यंत हंगामी अध्यक्ष तेच राहतात.” असेही ते म्हणाले.
“काल नवीन सरकारने हंगामी अध्यक्ष बदलला. आमदार दिलीप वळसे हे हंगामी अध्यक्ष झाले. ते अध्यक्ष का झाले तर हंगामी अध्यक्षांना सर्व नियम अधिकार बदलायचे अधिकार असतात. ती सुरुवात झाली. आतापर्यंत अध्यक्ष सुरुवातीला निवडला जातो, त्यानंतर विश्वासदर्शक ठराव होतो. मात्र आता विश्वासदर्शक ठराव आज ठरवला जाणार आहे. त्यानंतर उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत प्रथा परंपरेनुसार किंवा कायद्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक ही गुप्त मतदानाने होते.” असेही चंद्रकांत पाटील (chandrakant patil criticized on sworn taking ceremony) म्हणाले.
“मात्र आता हंगामी अध्यक्षाला नेहमीच्या अध्यक्षाप्रमाणे सर्व अधिकार असतात असे सांगून उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त न करता उघड़पणे करण्याचा विचार सुरु आहे. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. हे जे चाललं आहे. ते सर्व कायद्याची पायमल्ली आहे.” अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
“कोणत्या ना कोणत्या एकत्रित येऊन सरकार आलं आहे. ते त्यांनी चालवावं. आम्ही समर्थपण विरोधी पक्ष म्हणून सक्षम आहोत. असे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले.
“भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. जर तुमचे 170++ चा दावा असेल तर गुप्त मतदान घ्या,” असेही आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी (chandrakant patil criticized on sworn taking ceremony) केले.
“महिनाभर आमदारांना डांबून का ठेवलं. त्यांचे मोबाईल का काढले. त्यांना कुटुंबाशी संपर्क का होऊ देत नाही. मात्र बहुमत सिद्ध होऊ द्यायच नाही. अध्यक्ष निवडी पर्यत द्यायच नाही. मारुन मुटकून सरकार चालवता येत नाही. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.