मुंबई : गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘जलेबी फाफडा’ डिप्लोमसी आखली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येकाला कल्पकता वापरण्याचा अधिकार आहे. शेवटी मतदार सूज्ञ असतो” असं चंद्रकांतदादा म्हणाले. (BJP Chandrakant Patil reacts on Shivsena Jalebi Fafda Diplomacy)
“प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, कल्पकता वापरण्याचा अधिकार आहे. शेवटी मतदार सूज्ञ असतो. तात्पुरते करणारे चांगले की देशाच्या हिताचे लाँग टर्म निर्णय घेणारे चांगले, हे ठरवणारी राज्यातील जनता सूज्ञ आहे” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं सांगत गुजराती बांधवांसाठी जिलेबी-फाफडाची मेजवाणी देण्याचा शिवसेनेचा बेत चांगलाच यशस्वी झाला आहे. शिवसेनेच्या या ‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’चं फलित म्हणून येत्या रविवारी 7 फेब्रुवारी रोजी 21 गुजराती उद्योगपती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
फडणवीसांच्या फोटोवर भाष्य
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा काही गुंडांसोबत फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला आहे. “आम्ही सगळे गर्दीमध्ये राहणारे लोक आहोत. अनेक जण येतात, फोटो काढून घेण्याची विनंती करतात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर लेबल लावलं नसतं की हा कोण आहे, दिवसाला किमान 1000 फोटो काढतात, नंतरच्या काळात अशा गोष्टी त्या नेत्याशी जोडणं हे अतिशय हास्यास्पद आहे” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर असलेल्या गुजराती मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शिवसेनेने मुंबईत ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी घोषणा देत जिलेबी, फाफडा आणि वडापावचा मुंबईत बेत आखला होता. या कार्यक्रमाला गुजराती बांधवांना बोलवण्यात आलं होतं. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वात या भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला गुजराती बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला होता. (BJP Chandrakant Patil reacts on Shivsena Jalebi Fafda Diplomacy)
शिवसेनेने गुजराती बांधवांसाठी येत्या 7 फेब्रुवारी रोजी आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात गुजराती बांधवांसाठी रासगरबाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच याचवेळी 21 गुजराती उद्योजक आणि व्यावसायिकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!
‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद
(BJP Chandrakant Patil reacts on Shivsena Jalebi Fafda Diplomacy)