प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती कुणासोबत? शिंदे की ठाकरे? चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर काय?

बावनकुळे म्हणाले, ' प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत, त्यांना सगळं कळतं... उद्धवजी सोन्याच्या चमच्याने बदाम खाऊन मोठे झालेले नेते आहेत..

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती कुणासोबत? शिंदे की ठाकरे? चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 11:36 AM

दत्ता कनवटे, औरंगाबादः एकिकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी भेटी वाढल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबंडेकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे (Thackeray) गटाची युती होण्याची चिन्हे दिसत होती. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. पण या चर्चांदरम्यान एक मोठा ट्विस्ट आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांचीही भेट झाली. त्यामुळे आता वंचितची युती नक्की कुणाशी होणार याविषयी आडाखे बांधले जात आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवजी सोबत कुणीही राहू शकत नाहीत.. त्यांचे आमदार त्यांच्यासोबत नाहीत… जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत, ते काय प्रकाश आंबेडकर यांना कसे सांभाळतील? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं.

बावनकुळे पुढे म्हणाले, ‘ प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत, त्यांना सगळं कळतं… उद्धवजी सोन्याच्या चमच्याने बदाम खाऊन मोठे झालेले नेते आहेत.. उद्धवजींच्या रक्तातच युती टिकवणे नाही.. ते कुणाचाच सन्मान ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर उद्धव यांच्यासोबत जाणार नाहीत, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं.

‘…तर आघाडी रिकामी होईल’

येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे मोठे नेते येणार आहेत, असा दावा चंद्रशेखर यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पूर्ण पक्ष रिकामा होईल… शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे.. ही सगळी लोक भाजपामध्ये येतील यात बरीच मोठे मोठी नावं आहेत.. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे..

प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील असेही बावनकुळे म्हणाले ..लातूरहून अमित देशमुख भाजपमध्ये येणार अशी चर्चा होती त्यावर उत्तर देताना बावनकुळे असे बोलले…

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.