मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिसाद, केली ही मोठी घोषणा

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढीव वील बिलाविरोधातलं आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. | Chandrashekhar bawankule

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिसाद, केली ही मोठी घोषणा
मुख्यमंत्र्यांना बऱ्याच विषयांचा अभ्यास करावा लागतो, मग मुख्यमंत्री वेळ मागून घेतात, मग अधिकारी सांगतील त्याप्रमाणे वागतात.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 8:56 PM

नागपूर : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रस्तावित आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या संसर्गाच्या (Corona Virus Update) पार्श्वभूमीवर आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेत असल्याचं वानकुळे यांनी सांगितलंय. (BJP Chandrashekhar bawankule respond Cm Uddhav Thackeray Appeal)

येत्या 24 तारखेला भाजपचे वाढीव वीज बिल माफीसाठी राज्यात 560 ठिकाणी आंदोलन होणार होते (BJP Protest) .परंतु राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता हे आंदोलन स्थगित करण्याचा मोठा निर्णय बावनकुळे यांनी जाहीर केला आहे.

राज्यातील 560 ठिकाणी वाढीव वीज बिलाविरोधात जेलभरो आंदोलन करुन सरकारला घेरण्याचा प्लॅन भाजपने आखला होता. 50 हजार कार्यकर्ते जेलमध्ये जातील असं नियोजन भाजपने केलं होतं. परंतु सध्याची कोव्हिड परिस्थिती पाहता हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे.

जेलभरो आंदोलन स्थगित, बावनकुळेंची मोठी घोषणा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली आणखी कठोर करण्यात येतीय. राज्यातल्या शहरी आणि भागांत रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीये. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय आवाहन केलंय…?

राज्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारपासून राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. तसंच कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात अशा तत्सम कार्यक्रमांचं आयोजन करु नये, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

(BJP Chandrashekhar bawankule respond Cm Uddhav Thackeray Appeal)

हे ही वाचा :

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायचा का? मुख्यमंत्र्यांचं जनतेला 8 दिवसांचं अल्टीमेटम

लॉकडाऊन हा उपाय आहे की नाही?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.