किमान माझी ‘मॉडर्न चाणक्‍य’ ही इमेज तरी सुधारली : अमित शाह

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींमुळे मी आनंदी आहे. किमान माझी 'मॉडर्न डे चाणक्य' अशी बनणारी प्रतिमा तरी तुटली, असं अमित शाह म्हणाले

किमान माझी 'मॉडर्न चाणक्‍य' ही इमेज तरी सुधारली : अमित शाह
Follow us
| Updated on: Dec 18, 2019 | 1:19 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींमुळे मी आनंदी आहे. किमान माझी ‘आजचा चाणक्‍य’ ही इमेज तरी सुधारली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह (Amit Shah on Modern Day Chanakya) यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र शिवसेनेने पाठिंबा न दिल्यामुळे भाजपने अजित पवारांना हाताशी धरुन सरकार स्थापन केलं. मात्र बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. परंतु भाजप अपयशी ठरला नाही, असा अमित शाह यांना अजूनही वाटतं.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींमुळे मी आनंदी आहे. किमान माझी ‘मॉडर्न डे चाणक्य’ अशी बनणारी प्रतिमा तरी तुटली, असं शाह एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले.

‘मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षेमुळे हा प्रश्न निर्माण झाला. कोणतीही अडचण नव्हती- आमच्याकडे 105 जागा होत्या, त्यांच्या (शिवसेना) 56 होत्या. आम्ही राज्यपालांकडे जाणार होतो. भाजपचे मुख्यमंत्री नेमले जाणार होते. पण त्यानंतर शरद पवारांनी गळ टाकला आणि शिवसेनेा गळाला लागली’ असं शाह म्हणाले.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन भाजपने कधीही दिलं नव्हता, असा पुनरुच्चार अमित शाह यांनी केला. आमचा सहयोगी पक्ष पळून गेला, म्हणून आम्हाला सरकार बनवता आले नाही. एवढेच!” असंही शाह पुढे म्हणाले.

निवडणुकीपूर्वी जर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी विचारणा केली असती तर भाजपने एखादे सूत्र ठरवले असते, असेही शाह म्हणाले. शिवसेनेने नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा उचलला आणि नंतर युती तोडली. हा आमच्यासाठी एक धडा आहे.” असंही अमित शाह (Amit Shah on Modern Day Chanakya) यांनी स्पष्ट केलं.

जितका विरोध करायचा तितका करा, नागरिकत्व कायद्यावर झुकणार नाही : अमित शाह

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात जोरदार आंदोलनं होत आहेत. तसेच हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत कायदा मागे घेण्याची मागणी होत आहे. त्यानंतर अमित शाह यांनी कितीही विरोध झाला तरी कायदा मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.