भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही : सूत्र
"जर शिवसेना सरकार बनवत असेल, तर भाजप विरोधात बसणार" असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP Core Committee Meeting) आहे. या
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं (BJP Core Committee Meeting) आहे. याबाबतच्या चर्चेसाठी आज वर्षावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजपने सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला (BJP Core Committee Meeting) आहे. “जर शिवसेना सरकार बनवत असेल, तर भाजप विरोधात बसणार” असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP Core Committee Meeting) आहे. यामुळे भाजपात दोन गट तयार झाले आहेत.
या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या प्रमुख नेत्यांनी गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा केली. जर शिवसेना सरकार बनवत असेल, तर भाजप विरोधात बसायला तयार आहे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भाजपमध्ये दोन गट तयार झाले आहेत. तसेच विश्वासदर्शक ठराव मांडण्यावरुन एकमत न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप हा 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे भाजपने अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही असाही सूर बैठकीत उमटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे जर भाजपने सत्तास्थापन करण्यास विरोध केला. तर राज्यपाल काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्यासाठी बोलवलं जाऊ शकतं असेही सूत्रांनी सांगितले आहे.
‘वर्षा’वर बैठकांचे सत्र
दरम्यान नुकतीच कोअर कमिटीची एक बैठक संपली आहे. यानंतर संध्याकाळी 4 च्या दरम्यान ‘वर्षा’ बंगल्यावर पुन्हा एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत अमित शाहांशी भाजपचे नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार असल्याचेही बोललं जात आहे.
यात राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर भाजप जनतेसमोर भूमिका मांडणार असून निर्णय राज्यपालांना कळवणार असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संघर्ष सत्तास्थापनेचा
भाजप हा 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.
शिवसेनेला आतापर्यंत 8 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 64 वर पोहचलं आहे. भाजपला 11 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 116 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं.
शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन संघर्ष सुरु झाला. त्यामुळे बहुमत सिद्ध करताना शिवसेना काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचं (BJP Core Committee Meeting) आहे.
फडणवीसांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. तो मंजूर करत राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास फडणवीस यांना सांगितलं. भाजप बहुमतापासून फार दूर असल्यामुळे राज्यपालांनी दिलेलं सत्तास्थापने आमंत्रण स्वीकारुन बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान भाजपसमोर असेल.
संबंधित बातम्या :
राज्यपालांची फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्याबाबत विचारणा
राज्यपालांनी आघाडीला बोलवावं, देवरांचे ट्विट ; शिवसेनेसोबत जाणं आत्मघातकी, संजय निरुपम यांचा टोला